United Nations General Assembly : युद्धविरामावर 'संयुक्त राष्ट्रसभेत' मतदान, मसुद्याला भारताचा विरोध; कारण काय?

India's Stand United Nations General Assembly : दहशतवादी हमास या संघटनेचा उल्लेख नसल्याकारणाने...
United Nations General Assembly
United Nations General AssemblySarkarnama
Published on
Updated on

India's Stand United Nations General Assembly : संयुक्त राष्ट्रसभेत (UNGA) जॉर्डनने मांडलेल्या ठरावाच्या मसुद्यावर मतदान करण्यासंदर्भात भारताने अलिप्त राहण्याचे ठरवले आहे. इस्त्रायल-हमास युद्धाला मानवतावादी दृष्टीने तत्काळ पूर्णविराम द्यावा, असे आवाहन या मसुद्यात केले होते. मात्र, यामध्ये दहशतवादी हमास या संघटनेचा उल्लेख नसल्याकारणाने या मसुद्यावर मतदान केले नाही.

या मसुद्यात गाझा पट्टीला कोणत्याही अटी-शर्थी आणि अडथळ्यांशिवाय मानवतावादी दृष्टिकोनातून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये बांगलादेश, मालदीव, पाकिस्तान, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेसह 40 हून अधिक देशांचा पाठिंबा आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, जपान, युक्रेन आणि यूके या देशांनीही मसुद्यावर मतदान करण्यापासून दूरच राहणे पसंत केले. संयुक्त राष्ट्रसभेमध्ये हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. 120 देशांनी या मसुद्याच्या बाजूने मतदान केले, तर 14 देशांनी याला सहमती दर्शवली नाही तर एकूण 45 देशांनी मतदान केले नाही.

प्रस्तावात मसुद्यात काही अंशी दुरुस्ती करण्यात आली. यात एक परिच्छेदाचा समावेश करण्यात आला. "सर्वसाधारण सभेने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्राईलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ले आणि हमासने काही नागरिकांना ओलिस ठेवल्याच्या अमानवी कृतीचा धिक्कार करून, त्याचा निषेध करत आहोत. हमासने ओलिस ठेवलेल्या नागरिकांना मानवतेने वागवले पाहिजे आणि त्यांची त्वरित आणि बिनशर्त सुटका केली जावी."

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com