Modi Mumbai visit : मोदींच्या मुंबई दौऱ्यानंतर सीएम फडणवीस 'अ‍ॅक्शन मोड'वर; 24 तासांच्या आताच घेतला मोठा निर्णय !

Devendra Fadnavis News : सीएम फडणवीस आता अ‍ॅक्शन मोडवर आले असून राज्यभरातील तयारीचा आढावा येत्या तीन दिवसात घेणार आहेत.
devendra fadnavis | narendra modi
devendra fadnavis | narendra modisarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपने आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठीची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मैदानात उतरले आहेत. येत्या काळात टप्याटप्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायती तर त्यानंतर महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत.

या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसापासून भाजपची तयारी सुरु आहे. त्यामुळेच आता सीएम फडणवीस आता अ‍ॅक्शन मोडवर आले असून राज्यभरातील तयारीचा आढावा येत्या तीन दिवसात घेणार आहेत. त्यासाठी तीन दिवसांत राज्यातील सहा विभागाचा आढावा घेणार आहेत.

राज्यात येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या कामाला लागला आहेत. पीएम नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील भाजपचे (BJP) मंत्री, आमदार, खासदार आणि मंत्र्यांना पंतप्रधान कानमंत्र दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. त्यासाठी 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान तीन दिवसात सहा विभागाचा विभागनिहाय आढावा घेणार आहेत.

devendra fadnavis | narendra modi
Solapur BJP : सोलापूर भाजपमध्ये वाद पेटला; आमदार देशमुखांच्या कार्यक्रमाला जाऊ नका, कोठे, शहराध्यक्षांनी सूचना केल्याचा आरोप

या विभाग स्तरावरील बैठकीस राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा जिल्हानिहाय घेतला जाणार आहे. या बैठकीस प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली जाणार आहे. त्यानुसार येत्या काळात स्थानिक पातळीवरील समीकरणे लक्षात घेऊन निवडणुकीत महायुती की स्वबळावर निवडणूक लढवायची याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

devendra fadnavis | narendra modi
Anil Parab: योगेश कदमांविरोधात अनिल परब पुन्हा मैदानात : घायवळ प्रकरणात थेट PM मोदींचं नाव घेत फडणवीसांनाही पकडलं कोंडीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित 10 ऑक्टोबरला नाशिक, मराठवाडा या दोन विभागाचा आढावा घेतला जाणार आहे तर 11 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाचा तर 13 ऑक्टोबरला अमरावती, कोकणाचा आढावा घेतला जाणार आहे.

devendra fadnavis | narendra modi
Yogesh Kadam : 'पोलिसांच्या अहवालानुसारच...', गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याच्या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदमांची पहिली प्रतिक्रिया

या आढावा बैठकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्यांना विजयी रणनीतीचा 'कानमंत्र' देण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. गटबाजी आणि अंतर्गत वाद टाळण्यासाठी त्यासोबतच स्वयंशिस्त आणि एकजुटीचा संदेश दिला जाणार आहे. या बैठकीत प्रत्येक लोकप्रतिनिधीला त्यांच्या क्षेत्रातील बूथ स्तरावरची जबाबदारी निश्चित करून दिली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

devendra fadnavis | narendra modi
Rohit Pawar News : आता ज्युनिअर पवार काका-पुतण्या संघर्ष पेटला; रोहित पवारांचे अजितदादांना ओपन चॅलेंज!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com