NCP Politics : अजित पवारांनी काढला हुकमी एक्का! रोहित पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरला?

NCP Politics Ajit Pawar Rohit Patil : महायुतीमध्ये तासगाव-कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघ हा अजित पवार यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोहित पाटलांच्या विरोधात अजित पवार कोणता उमेदवार देणार याची उत्सुकता आहे.
Ajit Pawar Rohit Patil
Ajit Pawar Rohit Patil sarkarnama
Published on
Updated on

NCP Politics : तासगाव- कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सुमन पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे विधानसभेच्या रिंगणात असणार आहेत. मागील दोन ते अडीज वर्षापासून ते विधानसभेची तयारी करत आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर रोहित पाटील यांनी शरद पवारांना साथ दिली.

रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार तासगाव- कवठे महाकाळमधून असताना महायुतीमध्ये रोहित पवार यांच्या विरोधात कोण लढणार याची चर्चा होती.

महायुतीमध्ये तासगाव-कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघ हा अजित पवार यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोहित पाटलांच्या विरोधात अजित पवार कोणता उमेदवार देणार याची उत्सुकता असताना भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी 'घड्याळ' हाती बांधत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Ajit Pawar Rohit Patil
Chandgad Assembly Election : महाराष्ट्राने एवढी अटीतटीची लढत पहिल्यांदाच पाहिली; केवळ अकरा मतांनी माजी मंत्री पराभूत

संजयकाका पाटील यांना अजित पवारांकडून उमेदवारी घोषित झाली नाही. मात्र, उमेदवारीसाठीच संजयकाका पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे कवळे महांकाळमध्ये रोहित पाटील विरुद्ध संजयकाका पाटील अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवारांचा 'मास्टर स्ट्रोक'

तासगाव-कवठे महांकाळची निवडणूक एकतर्फी होईल, असे वाटत असताना अजित पवारांना संजयकाका पाटील यांना आपल्या पक्षात प्रवेश देत तासगाव-कवठे महांकाळची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत दिले आहेत. अजितराव घोरपडे आणि संजयकाका पाटील यांच्यामध्ये समेट देखील झाली आहे.

Ajit Pawar Rohit Patil
Akhilesh Yadav : भाजपची मोठी खेळी; अखिलेश यादव यांच्या मेव्हण्याला दिले तिकीट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com