Ravindra Chavan : निलेश राणेंचा आक्रमकपणा भाजपला जड गेला? रवींद्र चव्हाणांना स्वतःच्याच जिल्ह्यात दोनवेळा माघार घेण्याची वेळ

Konkan politics : तळकोकणात नुकताच नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून येथे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मोठा वाद झाला. जो अद्याप शमलेला नाही.
Nilesh Rane warning Ravindra Chavan
Nilesh Rane warning Ravindra ChavanSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सिंधुदुर्गमधील नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गट रिंगणात उतरल्यानं महायुतीत तणाव निर्माण झाला.

  2. राणे कुटुंबातील जुने वाद पुन्हा पेटले असून आता रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्यातील संघर्ष थेट धमकीपर्यंत पोहोचला.

  3. या घडामोडीत भाजपला पुन्हा एकदा माघार घ्यावी लागल्याची चर्चा असून चव्हाणांना स्वतःच्या जिल्ह्यात दोनदा पराभवाची स्थिती आली असल्याचे बोलले जात आहे.

Sindhudurg News : नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी या तीन नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायतीसाठी मतदान पार पडले. निवडणुकांमुळे राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असतानाच महायुतीमधील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनाच एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरल्याने राजकीय चित्र बदलले. यातूच येथे आधी नारायण राणे त्यांच्या दोन मुलांमध्ये राजकीय युद्ध रंगले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्यात वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर थेट धमकी देण्यापर्यंत गेली मात्र यावेळी देखील भाजपलाच येथे माघार घ्यावी लागल्याचे समोर आले आहे. यामुळे रवींद्र चव्हाणांना स्वतःच्याच जिल्ह्यात एकदा नव्हे तर दोनदा राणेंविरोधात माघार घेण्याची वेळ आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नुकताच निवडणुकीच्या कालावधीत आमदार निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपला अंगावर घेतले होते. त्यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पैसे वाटपासाठी पैशांच्या बॅगा उतरल्याचा आरोप केला होता. ज्यानंतर यावरून राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. तर भाजप आणि शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला होता. ज्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी आपल्याला युती टिकवायची आहे असे म्हणत धमकीच दिली होती. ज्यानंतर शिवसेना आणि निलेश राणे आणखीन आक्रमक झाले होते.

त्यांनी पुन्हा आपला रोख रवींद्र चव्हाण यांच्याकडे करत खोचक सवाल करत त्यांना डिवचले होते. यानंतर महायुती फुटण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान कोकणासह राज्यात महायुतीत सुरू असणाऱ्या वादांवर पडदा टाकण्यासाठी तह करत भाजपने दोन पावले मागे हटण्याची भूमिका घेतली आहे. ज्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडी येवून पत्रकार परिषद घेत दिली होती. यावरून आता रवींद्र चव्हाण यांना आमदार नीलेश राणे यांच्यासमोर झुकावे लागतेय, ही सिंधुदुर्गमधील सत्ताधारी पक्षासाठी शरमेची बाब असल्याची टीका काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी केली आहे.

Nilesh Rane warning Ravindra Chavan
Eknath Shinde Vs Ravindra Chavan : भर व्यासपीठावर शिंदेसोबत काल काय ठरलं? आज रविंद्र चव्हाणांकडून थेट एका पक्षप्रवेशालाच स्थगिती

तसेच त्यांनी केलेल्या टीकेची आता जिल्ह्यात चर्चा ही सुरू झाली आहे. मोंडकर यांनी काही वर्षांत सावंतवाडी येथील युवा कार्यकर्ते विशाल परब यांना प्रदेश युवा मोर्चात दिलेले स्थान आणि त्यानंतर नीलेश राणे-रवींद्र चव्हाण यांच्यात वाद सुरू झाला होता. तसेच परब यांना ताकद देवून खासदार राणेंना डिवचण्याचे काम केलं होते. कारण भाजपच काय तर शिवसेनेत कोणाचा प्रवेश करून घ्यायचा असेल तर किमान तळकोकणात मला विचारावं लागेल, त्या शिवाय तो प्रवेश होणार नाही असा दम राणेंनी भरला होता. यानंतरही रवींद्र चव्हाण यांनी परब यांना भाजपमध्ये घेत प्रवेश दिला होता. ज्यानंतर वाद वाढत गेला होता.

या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली होती. तसेच स्वतः चव्हाण यांना पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. ज्यानंतर या वादावर पडदा पडला होता. त्यानंतर ऐन निवडणूक कालावधीत लक्ष्मीदर्शनाच्या मुद्द्यावरून निलेश राणेंनी रवींद्र चव्हाण यांना घेरलं होतं. तसेच शिंदेंच्या शिवसेनेनं मालवण, सावंतवाडीमधील भाजप कार्यकर्त्यांना धडा शिकवला होता. यामुळे आणखी वाद वाढवून भाजपचे नुकसान होऊ नये, वाद वाढू नये, यासाठी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन पत्रकार परिषद घेत सर्व गोष्टींवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

त्यामुळेच आता जिल्ह्यात राणेंना शह देणं शक्य नसल्याची चर्चा सुरू झाली असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना निलेश राणे जड गेल्याची चर्चा रंगली आहे. तसेच एकदा नव्हे तर दोनदा स्वतःच्याच जिल्ह्यात त्यांना माघार घ्यावी लागल्याची आचा टीका होताना दिसत आहे.

Nilesh Rane warning Ravindra Chavan
Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण माझे नेते! नगरपालिकेची निवडणूक उरकताच निलेश राणेंची तलवार म्यान, लवकरच भेटही घेणार

FAQs in Marathi

1. सिंधुदुर्गमधील निवडणुकांमध्ये महायुतीत संघर्ष का झाला?
भाजप आणि शिंदे शिवसेना दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले.

2. राणे कुटुंबातील वाद पुन्हा का उफाळून आला?
नारायण राणे यांच्या दोन मुलांमध्ये पूर्वीपासूनची राजकीय स्पर्धा या निवडणुकीत पुन्हा दिसून आली.

3. रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्यात काय वाद झाला?
निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला आणि प्रकरण धमकीपर्यंत गेले.

4. भाजपने माघार घेतल्याची चर्चा का आहे?
राणेंविरोधात उभे राहून भाजपला मागे हटावे लागल्याच्या घटना सलग दोनदा घडल्याचे बोलले जाते.

5. या संघर्षाचा निवडणुकीवर परिणाम होईल का?
होय, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com