BJP-Shivsena clash : सत्तेत दोस्ती, महासभेत कुस्ती! शिवसेनेच्या महापौरांकडून भाजप नगरसेवकाच्या निलंबनाचे आदेश

Ulhasnagar Municipal Corporation High Voltage Drama : उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला असून भाजप नगरसेवकाने सभागृह सोडण्यास नकार दिल्यानंतर महापौरांचा संताप अनावर झाल्याचे समोर आले आहे.
Ulhasnagar Municipal Corporation; BJP-Shivsena clash
Ulhasnagar Municipal Corporation; BJP-Shivsena clashsarkarnama
Published on: 
Updated on: 

- नवनीत बऱ्हाटे

BJP Vs Shivsena : सत्तेत दोस्ती अन् महासभेत कुस्ती असे काहीसे चित्र उल्हासनगर महालिकेच्या महासभेत पाहायला मिळाले. उल्हासनगर महापालिकेत शिवसेना-भाजपमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली. भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांच्या वक्तव्यावर ‘माझा बाप काढला’ म्हणत महापौर अश्विनी निकम संतापल्या. त्यानंतर महापौरांनी प्रधान पाटील यांना सभागृहाबाहेर जाण्याचे निर्देश देत निलंबनाचे आदेश दिल्यानंतर त्यांनी ठिय्या मांडला आणि महासभेत जोरदार गदारोळ उडाला.

उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत शिवसेना आणि भाजपमधील राजकीय संघर्षाचा भडका उडाल्याने सभागृहात चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. महासभेतील चर्चेदरम्यान भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर महापौर अश्विनी निकम यांनी तीव्र आक्षेप घेतला.

‘माझा बाप काढला’ असे म्हणत संतप्त झालेल्या महापौरांनी पाटील यांना तत्काळ सभागृहाबाहेर जाण्याचे निर्देश दिले. मात्र पाटील यांनी सभागृह सोडण्यास नकार देत ठिय्या मांडल्याने वातावरण आणखी तापले. यावेळी शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक आमने-सामने आल्याने आरोप-प्रत्यारोप आणि शाब्दिक चकमकींनी महासभा गाजली.

Ulhasnagar Municipal Corporation; BJP-Shivsena clash
BJP Vs shivsena : भाजप नगरसेवकाला नगरपरिषदेच्या आवारातच धक्काबुक्की, 'टक्केवारी'च्या आरोपाने खळबळ

अखेर महापौर निकम यांनी प्रधान पाटील यांच्या निलंबनाचे आदेश सचिवांना दिले. या निर्णयानंतर भाजप नगरसेवकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने काही काळ सभागृहातील वातावरण तणावपूर्ण झाले.

Ulhasnagar Municipal Corporation; BJP-Shivsena clash
BJP Corporator Shibir : माध्यमांशी बोलू नका अन् कमर्शिअल नगरसेवक बनू नका : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी शिबिरात भाजप नगरसेवकांना सल्ला

विशेष म्हणजे महापालिकेत शिवसेना आणि भाजप सत्तेत एकत्र असतानाही दोन्ही पक्षांतील मतभेद सातत्याने समोर येत आहेत. स्वीकृत सदस्यांच्या निवड प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या वादानंतर आता महासभेत थेट महापौर आणि भाजप नगरसेवक यांच्यातच संघर्ष उफाळल्याने युतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा चर्चेत आली आहे. सत्तेत एकत्र असलेले सेना-भाजप सभागृहात मात्र आमने-सामने आल्याचे चित्र या गदारोळातून पाहायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com