Yuvraj Lakhamraje Bhosale News: सिंधुदुर्गात पाय रोवण्यासाठी भाजपकडून युवराज लखमराजेंना मोठी जबाबदारी

Sawantwadi Politics News: युवराज लखमराजे भोसले यांनी गेल्यावर्षी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
 Yuvraj Lakhamraje Bhosale
Yuvraj Lakhamraje Bhosale Sarkarnama

Sindhudurg Political News: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणात आपले पाय रोवण्यासाठी भाजपने थेट राजघरण्याचीच निवड केली आहे. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांना भाजपाच्या युवा आघाडीचे उपाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली आहे. या लखमराजेंच्या निवडीचा भाजपला सिंधुदुर्गमध्ये फायदा मिळणार आहे.

युवराज लखमराजे भोसले यांनी गेल्यावर्षी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गावोगाव बैठकांच्या माध्यमातून त्यांनी संघटना वाढवण्यासाठी जोमाने काम सुरू केले. त्यांनी गावागावांत भेटीगाठी सुरू केल्या होत्या. त्यांच्या कामाची दखल घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार लखमराजेंची ही निवड करण्यात आली. आज त्यांना भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपद देऊन मोठी जबाबदारी देण्यात आली. लखमराजेंच्या काम पाहता, लखमराजे यांच्यामुळे राजघराण्याला मानणारे अनेक जण भाजपासाठी काम करू लागल्याचीही माहिती आहे.

 Yuvraj Lakhamraje Bhosale
Maharashtra Should Waive Farm Loans : तेलगंणा सरकारचा कित्ता महाराष्ट्र सरकारनं गिरवावा ! ; शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा..

मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून कोकण विभागातून त्यांची निवड झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून लखमराजेंना निवडीचे पत्र दिले. या निवडीमुळे लखमराजे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

लखमराजेंनी भाजपात प्रवेश करून एक वर्ष लोटले तरी त्यांना पक्षात कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. पण त्यांच्या कामाचा झपाटा आणि संघटना बांधणीची पद्धत पाहता पक्षातील वरिष्ठांनी त्यांना थेट राज्यस्तरावरील जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे २०२४ मधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थानिक पातळीवरील पक्ष बांधणीपासून राज्यस्तवरही भाजपने निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com