Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच एकूण 158 पक्ष निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागले होते.
या निवडणुकीत सुरुवातीचे कल महायुतीच्या बाजूने जात असल्याने कोण विजयी गुलाल उधळणार याकडे जनतेचे लक्ष लागले असतानाच भाजपचे नेते तथा आमदार प्रवीण दरेकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. कलामध्ये महायुतीने 200 चा आकडा ओलंडला आहे तर दुसरीकडे भाजपने 125 जागांवर आघाडी घेतली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 60 जागांवर आघाडी दिसत आहे. त्यामुळे भाजप पुन्हा सत्तेत येणार हे दिसत असताना आमदार प्रवीण दरेकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे. 'देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील', असे त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.
महायुतीला मिळत असलेलं हे बहुमत हे लाडकी बहीण योजनेचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. दुसरीकडे अनेक अटीतटीच्या लढतीतही महायुतीचं पारडं जड दिसून येत आहे. आज सकाळी मतमजोणीला सुरुवात झाल्यापासूनच कलांमध्ये महायुतीने बहुमताचा आकडा पार केलेला दिसत आहे.
महाराष्ट्राच्या भवितव्याचा फैसला करणारी ही निवडणूक होती. या निवडणुकीचा निकाल समोर येत असून यातून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असल्याचं दिसून येत आहे. यामुळे एकूणच महाविकास आघाडीला (MVA) आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर महायुतीवर आणि भाजपवर मोठा आरोप केला आहे. हा निकाल पैशांच्या बळावर लावून घेतला असल्याचं म्हटलं आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.