Maharashtra Politics Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्त शिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार जाहीर

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

संसदेच्या सर्वपक्षीय बैठकीला अजित पवार गटाची गैरहजेरी

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीसाठी महाराष्ट्रातून खासदार सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), श्रीकांत शिंदे (शिवसेना – शिंदे गट), आणि अरविंद सावंत (शिवसेना – उद्धव ठाकरे गट) उपस्थित राहिले. मात्र, अजित पवार यांच्या गटाकडून एकही खासदार वा प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित नव्हता. नियोजित दौऱ्यांमुळे हजेरी शक्य झाली नसल्याचे सांगितले जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्त शिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार जाहीर 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त प्रथम 'संतशिरोमणी श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २४ जुलै रोजी पंढरपुरात एका कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.

शेतकऱ्यांनो विसरा हमी …खेळा रम्मी…

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा कथित रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांनी विरोधी पक्षांनी चौफेर टार्गेट केले आहे. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी एक्सपोस्ट करत कोकाटेंवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांनो विसरा हमी …खेळा रम्मी…अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

आमिर, शाहरुख रमी खेळतो मग माणिकराव खेळले तर काय?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची पाठराखण केली आहे.शेतकरी आत्महत्या होत असताना कृषीमंत्री विधीमंडळात रमी खेळतायत. आमिर खान, शाहरुख खान रमी खेळतो. इतर हिरो रमी खेळतात मग माणिकराव कोकाटे रमी खेळले तर काय? ' या विधानाद्वारे त्यांनी कोकाटे यांच्या कृतीचे समर्थन केले.

उद्यापासून केंद्र सरकारचे पावसाळी अधिवेशन

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी २१ जुलैपासून सुरू होत आहे. ते येत्या २१ ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत व्हावं याकरता  सरकार या बैठकीत सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन करेल. या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होईल .

आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर

आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणूक स्वतंत्र लढायच्या की महाविकास आघाडीत याचा निर्णय स्थानिक पातळीवर करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. काँग्रेसने देखील आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ असे आपल्याला सांगितल्याचेही ठाकरे म्हणाले.

आज सर्वपक्षीय बैठक

सोमवारपासून द्र सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेसनाच्या आधी आज (रविवारी) 11 वाजता सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सहपरिवार तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. तये तुळजाभवानी मातेची अभिषेक पुजा केली. मंदिराच्या कामाची पाहणी देखील त्यांनी केली. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयात सरनाईक ड्रग्स प्रकरणाची आढावा देखील घेणार असल्याची माहिती आहे.

हा टोमणा नाही देवेंद्र फडणवीसांना मित्र म्हणून सल्ला - उद्धव ठाकरे 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले, त्यांच्या सहकार मंत्र्यांची लफडी बाहेर येतायेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत. हा माझा त्यांना कधीकाळचे सहकारी म्हणून सल्ला आहे .टोमणा नाही.

बीड हादरले, प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या

इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेला 21 वर्षीय शिवम चिकणे याला प्रेमसंबंधातून पाच जणांनी मारहाण केली. या मारहाणीमुळे उपचारादरम्यान शिवमचा मृत्यू झाला. ही घटना १८ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गंगावाडी ते तळवाडा रस्त्यावर घडली.

आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकारू - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी राज आणि ते एकत्र येण्याबाबत विचार व्यक्त केले. ते म्हणाले, राज आणि मी थेट चर्चा केली तर अडचण काय आहे कोणाला. मी आता त्याला फोन करू शकतो. तो फोन मला शकतो. बाकीचे लोक एकमेकांना भेटतात. आम्ही लोकांसारखे चोरून मारून भेटत नाही. ठाकरे आहोत जे करायचे ते उघडपणे करतो. आम्ही एकत्र आलो तर कुणाला प्रोब्लम आहे का? प्रोब्लेम असतील ते बघतील आपण का विचार करायचा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

२९ ग्रामपंचायती जिल्हा परिषदेत समाविष्ट करून प्रभागरचना करा, काँग्रेसची मागणी

'वसई तालुक्यातील मनपा मधून बाहेर असलेल्या 29 ग्रामपंचायती जिल्हा परिषद पालघरमध्ये समाविष्ट करूनच सुधारित प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करावी यासाठी काँग्रेसतर्फे निवेदन देत हरकती, सूचना नोंदवण्यात आल्या. कांग्रेस नेते विजय गोविंद पाटील व जिमी मतेस गोन्सालवीस याच्या तर्फे २९ ग्रामपंचायती जिल्हापरिषदेत समाविष्ट करण्याचा संदर्भाचा अर्ज आज तहसीलदार यांना सादर करण्यात आला. यावेळी संपूर्ण जिल्हा कांग्रेस कार्यकारणी तहसीलदार कार्यालयात हजर होती.

दोन मंडल अधिकाऱ्यांना निलंबित केले, यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

यवतमाळ महसूल विभागाच्या बैठकीत दिग्रस आणि उमरखेड येथील मंडलधिकाऱ्यांचे निलंबन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले. या कारवाईमुळे महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे.दिग्रसचे यु.एच. ठाकरे आणि उमरखेडचे पी.एम माने या दोघांवर निलंबन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com