Abdul Sattar News : मंत्री अब्दुल सत्तारांना झाली गोपीनाथ मुंडेंची आठवण, मतदारसंघात पुतळा उभारणार

Abdul Sattar remembers Gopinath Munde, will erect a statue in Sillod : लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्याविरोधात काम केल्यामुळे आता दानवे याची परतफेड विधानसभेला अब्दुल सत्तार यांना पराभूत करण्याच्या तयारीत आहेत.
Abdul Sattar News
Abdul Sattar NewsSarkarnama
Published on
Updated on

Sillod-Soygaon Assembly Politics News : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या माझ्या राजकीय जीवनात मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या मदतीमुळेच मला विधानपरिषदेवर आमदार होता आले, याची आठवण पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना झाली. मतदारसंघातील गेवराई सेमी गावातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी लवकरच गावात आणि सिल्लोड शहरात गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा उभारणार असल्याची घोषणा केली.

महायुती सरकारच्या वतीने शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ नुकताच अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या हस्ते करण्यात आला. गेवराई सेमी गावात आनंदाचा शिधा वाटप करत असताना त्यांनी गावातील नियोजित जागेवर दिवंगत लोकसनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे कुदळ मारून भुमीपूजन केले. गोपीनाथराव मुंडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, असे सांगतानाच त्यांच्या मदतीमुळेच मी विधानपरिषदेवर आमदार होऊ शकलो, असे सत्तार यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या पुतळा उभारण्याच्या कामाचे भुमीपूजन करतांना मनस्वी आनंद होत आहे. सिल्लोड शहरात देखील लवकरच गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा उभारण्यात, येईल अशी घोषणा सत्तार यांनी यावेळी केली. अब्दुल सत्तार मित्रमंडळ व तालुका शिवसेनेच्या वतीने शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधासाठी लागणारे 100 रुपये शुल्क भरण्यात येत आहे. मतदारसंघात शिधापत्रिका धारकांना 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर आणि खाद्यतेल चा समावेश असलेला आनंदाचा शिधा मोफत देण्यात येत आहे.

Abdul Sattar News
Minsiter Abdul Sattar News : अब्दुल सत्तार नरेंद्राचार्य महाराजांच्या चरणी लीन, म्हणाले त्यांच्या सावलीत उर्जा मिळते..

मतदारसंघात 250 स्वस्त दुकाने असून या अंतर्गत जवळपास 60 हजार शिधापत्रिका धारक आहेत. दोन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी अब्दुल सत्तार यांनी सुरू केली आहे. सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघातून सत्तार सलग तीन वेळा निवडून आलेले आहेत. (Gopinath Munde) आघाडी आणि युती अशा दोन्ही सरकारमध्ये सत्तार मंत्री राहिले आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीआधीच अब्दुल सत्तार आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील संबंध बिघडल्यामुळे सत्तार याच्या अडचणी वाढल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्याविरोधात काम केल्यामुळे आता दानवे याची परतफेड विधानसभेला अब्दुल सत्तार यांना पराभूत करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून महायुतीमधील या दोन नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यामुळे सिल्लोड पाकिस्तान बनत चालले आहे, असा आरोप करत खळबळ उडवून दिली होती.

Abdul Sattar News
BJP Vs Shivsena UBT : "चिंगम, शकुनी अन् पत्राचाळीचा लुटारू..."; सामना अग्रलेखातील फडणवीसांवरील टीका भाजपच्या जिव्हारी, राऊतांवर हल्लाबोल

तर या विधानच्या विरोधात अब्दुल सत्तार यांनी रान पेटवत समर्थकांना दानवे यांच्याविरोधात सिल्लोडमध्ये मोर्चा काढायला लावला होता. मतदारसंघातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सत्तार यांनी सुरू केले आहेत. गेवराई सेमी गावात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे भुमीपूजन आणि सिल्लोमध्येही त्यांचे स्मारक उभारण्याची केलेली घोषणा हा त्याचाच भाग असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com