Nanded Political News : नांदेडमध्ये नेत्यांचे वारसदार 'इन' कार्यकर्ते 'आऊट' ?

relatives get important posts : राजकारणात नातेवाईकांनाच मिळतायत महत्वाची पदे..
Shrijaya Chavhan, Pranita Devare-Chikhalikar, Minal Patil-Khatgaonkar
Shrijaya Chavhan, Pranita Devare-Chikhalikar, Minal Patil-KhatgaonkarSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : राजेशाही संपुष्टात आली आल्याने लोकशाही मार्गाने लोकप्रतिनिधींना निवडूण देण्यात येते. राजेशाही शासन प्रणालीत राजाचा मुलगा हा राजा व्हायचा. पण लोकशाही मार्गाने देखील लोकप्रतिनिधींचे वारसदार राजकारणात सक्रिय होऊन मोक्याच्या पदावर विराजमान झाले आहेत.

पण हे होत असताना सर्वसामान्य कार्यकर्ता जो तळागाळापर्यंत पक्षाचे काम, विचार पोहोचविण्यासाठी आयुष्यभर काम करतो त्याला काय मिळाले हा एक चिंतनाचा विषय झाला आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचे वारसदार राजकीय इनिंगच्या तयारीत आहेत. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण Ashok chavhan यांची राजकीय वारस म्हणून श्रीजया चव्हाण भोकर अथवा नांदेड Nanded उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे राजकीय गोटात बोलले जात आहे.

Shrijaya Chavhan, Pranita Devare-Chikhalikar, Minal Patil-Khatgaonkar
Swabhimani Protest: ऊस दरासाठी स्वाभिमानी पुन्हा आक्रमक; वसंतदादा कारखान्यात कार्यकर्ते घुसले

तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही राजकीय एन्ट्रीची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी मुलगी प्रणिता देवरे यांना आमदार करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यांना दक्षिण विधानसभा मतदारसंघ अथवा लोहा-कंधारमधून मैदानात उतरविले जाऊ शकते. त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय वलय आणि कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले आहे.

माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी सुनबाई डॉ. मीनल खतगावकर यांना राजकीय वारस म्हणून पुढे आणले आहे. त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात एन्ट्री केली आहे. त्यांच्या नावाची नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी चर्चा आहे. तर कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी आपल्या मुलाला लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केले आहे.

जिल्ह्यातील बहुतांश पालिका, नगरपरिषद तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींचे वारसदार राजकारणात सक्रिय आहेत. तसेच शिवसेना (शिंदे गट), शिवसेना ( ठाकरे गट), भाजपासह इतर राजकीय पक्षांतील लोकप्रतिनिधींचे वारस राजकारण चांगलाच जम बसवला आहे.

मराठवाड्यातील प्रस्थापित नेत्यांच्या वारसांनी राजकारणात चांगलाच जम बसवला आहे. कोणात्याही पक्षाचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे कार्यकर्ता असतो. पण महत्त्वाची पदे देण्याची वेळ आली तर आधी नेत्यांचे नातेवाईकांचे नांव पुढे येतात. नांदेड जिल्ह्यातील प्रमुख प्रस्थापित नेत्यांच्या वारसांनी राजकारणात एन्ट्री केली असून काही तयारीत आहेत.

Shrijaya Chavhan, Pranita Devare-Chikhalikar, Minal Patil-Khatgaonkar
Aaditya Thackeray News : घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या 'एफडी'ची मुदत '31 डिसेंबर...' !

पक्षाचे एकनिष्ठणे काम करुन जनाधार वाढविण्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण काय दिले हा प्रश्न नेत्यांना कधी तरी पडणार आहे का नाही ? कार्यकर्ते केवळ झेंडे लावणे, फलक लावणे यासाठीच पक्षाचे काम करावे काय ? हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्ह्यातील‌ आजी माजी खासदार, आमदारांचे वारस सक्रिय होत आहेत. आपल्या वारसांचे राजकीय बस्तान बसविण्यासाठी लोकप्रतिनिधी जीवाचा आटापिटा करित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आपल्या वारसांना उभे करून विजयी केले आहे.

( Edited by Amol Sutar )

Shrijaya Chavhan, Pranita Devare-Chikhalikar, Minal Patil-Khatgaonkar
Ajit Pawar News: अजित पवार गटातील आमदार देवेंद्र फडणवीसच पाडणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com