Rameshrao Aadaskar : ...म्हणून भाजपच्या रमेशराव आडसकरांचा संभाजीनगरला पाटबंधारे महामंडळासमोर ठिय्या आंदोलन

BJP Political News : ...यामुळे माजलगाव तालुक्याच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा मोठा प्रश्न मिटणार आहे.
Rameshrao Aadaskar
Rameshrao AadaskarSarkarnama

Majalgaon News : जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. या आदेशाला नाशिकमधील लोकप्रतिनिधींनी न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याबाबत कुठलीही कार्यवाही केलेली नाही. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील नेत्यांकडून मराठवाड्याच्या हक्काचे 8.6 टीएमसी पाणी रोखून धरले आहे.

याविरोधात सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनात माजलगाव भाजपा विधानसभेचे नेते रमेशराव आडसकर यांनी सहभाग घेतला.त्यांनी समर्थकांसह पाटबंधारे महामंडळाच्या दारात ठिय्या मांडला.

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणातून सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन रस्त्यावर उतरले.वरील,धरणातून जायकवाडीत 8.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असतांनाही अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील पुढाऱ्यांनी हे पाणी रोखून धरले आहे.त्यामुळे हे पाणी तातडीने सोडावे,या मागणीसाठी गोदावरी पाटबंधारे महामंडळासमोर (सिंचन भवन) सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला.

Rameshrao Aadaskar
Vidarbh BRS : 'पाँचसौ में बिकोगे तो ऐसेही रोड पाओगे'; लोकप्रतिनिधींना टोले लगावत 'बीआरएस' आक्रमक

आंदोलनात भाजपचे(BJP) माजलगाव विधानसभेचे नेते रमेशराव आडसकर समर्थकांसह सहभागी झाले. मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीच्या वतीने जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विलंब करणाऱ्या शासनाच्या विरोधात मराठवाड्यातील सर्व पक्षीय नेते लोकप्रतिनिधी तसेच औद्योगिक संस्थां,पाणी वापर सहकारी संस्थांकडून आज आंदोलन केले.(Marathwada News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी रमेशराव आडसकर(Rameshrao Aadaskar ) यांनी आंदोलनात सहभाग घेत समर्थकांसोबत पाटबंधारे महामंडळाच्या दारात ठिय्या धरला. संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत हक्काच्या पाण्यासाठी आग्रह केला. संबंधित सोडलेल्या पाण्यामुळे माजलगाव तालुक्याच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा मोठा प्रश्न मिटणार आहे.

त्यांच्यासमवेत भाजपा तालुकाध्यक्ष अरुण राऊत, बीड जिल्हा सचीव बबन सोळंके, माजी नगरअध्यक्ष डॉ. अशोक तिडके, लतिफ नाईक, ईश्वरअप्पा खुर्पे, शहराध्यक्ष अॅड.सुरेश दळवे, अनंत शेंडगे, सत्यनारायण उनवने, बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष,दिलीप सोळंके आदींचा सहभाग होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Rameshrao Aadaskar
IPS Tushar Doshi : लाठीमार प्रकरणी चर्चेत आलेल्या तुषार दोशींची पुणे गुन्हे विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com