Ambadas Danve News : मणिपूरमध्ये सगळं `ऑल इज वेल`, हे दाखवण्याचा प्रयत्न फसला..

Marathwada : बंगालमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी केंद्रीय पोलीस बळ लावले जाणे तुमच्या 'तथाकथित' काळजीचे उत्तम उदाहरण आहे.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama

Shivsena : मणिपूरमध्ये महिलेची नग्न धिंड आणि तिचा विनयभंग केल्याच्या व्हिडिओने देशभरात खळबळ उडाली. केंद्र आणि मणिपूरमधील भाजप सरकारवर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठत आहे. (Ambadas Danve News) त्यानंतर पश्चिम बंगालच्या ग्रामपंचायत निवडणुकीत देखील महिलांच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार घडला. मणिपूर प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधीमंडळ अधिवेशनात उमटले.

Ambadas Danve News
High Court News : कामगारांच्या आर्थिक शोषण प्रकरणी शपथपत्र दाखल करण्याचे आदेश...

याच मुद्यावरून आता सत्ताधारी भाजप (BJP) आणि विरोधक आमदारांमध्ये ट्विटर वाॅर सुरू झाले आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मणिपूर प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावर भाष्य करत ट्विट केले होते. याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील प्रत्युत्तर दिले.

दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अहो, भातखळकर भाजप शासित नसलेल्या राज्यात तुम्ही व्यवस्था लावण्यात 'तत्पर' आहातच. बंगालमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी केंद्रीय पोलीस बळ लावले जाणे तुमच्या 'तथाकथित' काळजीचे उत्तम उदाहरण आहे. (Shivsena) मणिपूरबाबत मात्र तुम्ही किती तत्पर आहात, हे त्या महिलांचा व्हिडिओ किती दिवसांनी बाहेर आला, हे जगाने पाहिलं. मुद्दा हाच आहे, की भाजप शासित मणिपूर राज्यात सगळं 'ऑल इज वेल' आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न फसला आहे, अशी टीका दानवे यांनी केली आहे.

तत्पुर्वी भातखळकर यांनी मणिपूरमध्ये जे घडलंय ते संतापजनकच आहे. त्याचा सर्वस्तरातून जळजळीत निषेधही होतो आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये तेच घडलंय, सत्ताधारी पक्षाने घडवलेले आहे, त्याबद्दल मौन कशाला बाळगले जातेय? की तिथल्या महीलांची अब्रू ही अब्रू नसते? भाजपाशाषित राज्यात अत्याचार झाले तरच बोलायचे हा फक्त दुटप्पीपणा नाही, ही विकृती आहे, असे ट्विट केले होते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com