High Court News : राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून सोळा शाळांच्या चौकशीला स्थगिती

The bench adjourned the ongoing inquiry into the schools on the complaint of the NCP worker : सुनावणीच्या दिवशी सर्व मुख्याध्यापक हजर झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा चौकशी समिती नेमली. त्यानंतर या समितीने चौकशी करुन अहवाल सादर केला. दरम्यान मुख्याध्यापकांनी चौकशी समितीचा अहवाल देण्याची विनंती केली. मात्र त्यांना तो देण्यात आला नाही.
Aurangabad  High Court
Aurangabad High CourtSarkarnama
Published on
Updated on

Beed Education Political News : राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्याच्या तक्रारीवरुन शिक्षण संचालकांनी सुरु केलेल्या सतरा शाळांच्या चौकशीला स्थगिती देत प्रतिवादी राज्यशासन, शिक्षण संचालक, उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. बीड येथील रामकृष्ण बांगर यांच्या नवनिर्माण व प्रगती शिक्षण संस्थेतर्फे 17 अनुदानित शाळा चालवल्या जातात.

राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा फड यांनी 27 जुन 2024 रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे शाळांच्या विरोधात तक्रार केली. (NCP) संस्थेच्या भगवान महाराज विद्यालय व इतर सोळा शाळांमध्ये बौद्धीक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे संस्थेवर प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात आली होती.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती नियुक्त केली. समितीने सर्व शाळांची चौकशी करुन शिक्षण उपसंचालकांकडे अहवाल सादर केला. उपसंचालकांनी हा अहवाल शिक्षण संचालकांना पाठवला. त्यानंतर संचालकांनी या अहवालाच्या आधारे सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावत 28 जुलै रोजी सुनावणी ठेवली.

Aurangabad  High Court
Ajit Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढणार 'या' जागांवर?

सुनावणीच्या दिवशी सर्व मुख्याध्यापक हजर झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा चौकशी समिती नेमली. त्यानंतर या समितीने चौकशी करुन अहवाल सादर केला. दरम्यान मुख्याध्यापकांनी चौकशी समितीचा अहवाल देण्याची विनंती केली. (Aurangabad High Court) मात्र त्यांना तो देण्यात आला नाही. उलट 22 ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी ठेवली. त्यामुळे हा सर्व प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करत मुख्याध्यापकांनी तीन याचिकांद्वारे खंडपीठात आव्हान दिले.

प्राथमिक सुनावणीत खंडपीठाने प्रतिवादी राज्य शासन, शिक्षण संचालक, उपसंचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि तक्रारकर्त्या रेखा फड यांना नोटीस बजावत शिक्षण संचालकांसमोर सुरु असलेल्या चौकशीला अंतरिम स्थगिती दिली. पुढील सुनावणी 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे, ॲड. डी. जे. चौधरी, पी. डी. बचाटे यांनी काम पाहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com