Chhagan Bhujbal : सावित्रीबाई फुलेंच्या कपाळाला कुंकू होते तरीही त्यांच्यावर शेण फेकले

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात ते बोलत होते.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

Chhagan Bhujbal : जगात ६० महिलांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्यातील एकाही महिलेच्या कपाळावर टिकली नाही. जगातील १५० देशांच्या दरडोई उत्पन्नात आपला १२२वा क्रमांक आहे. आपल्या पुढे असलेल्या १२१ देशातील कोणत्याही महिलेच्या कपाळावर टिकली नाही. असे असतानाही मनोहर भिडे महिलांना टिकली लावण्यास सांगतात. सावित्रीबाई फुलेंच्या कपाळाला खूप मोठे कुंकू होते. तरीही त्यांना का दगड मारले. का त्यांच्यावर चिखल फेकला. शेणाचा मारा केला. पण त्यांना मनुवाद आणायचा आहे, असा आरोप माजी मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी केला.

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, मी त्यांना मनोहर भिडेच म्हणतो. संभाजी भिडे नव्हे. कारण त्यांच्या समाजात संभाजी, संताजी, धनाजी अशी नावे ठेवत नसतात. बहुजन समाजाला गुंडाळण्यासाठी ते संभाजी भिडे आहेत. त्यांनी पत्रकारांना विचारले. टिकली का लावली नाही. समतेचे चक्र उलटे फिरविण्याचे काम केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेती करतानाचे व्हिडिओ व फोटो पुढे आले आहेत. भिडेंनी त्यांना त्यांच्या अंब्याची झाडे शेतात लावण्याची विनंती केली असावी. मात्र त्यावर शिंदे काय म्हणाले याबाबत मला माहिती नाही, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

Chhagan Bhujbal
Security: छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करा!

ते पुढे म्हणाले की, या लहान गोष्टी नाहीत. या गोष्टी मुद्दाम घडवून आणल्या जात आहेत. धर्मांध सत्तेच्या विरोधात लढण्याचे काम शाहू-फुले-आंबेडकरांकडून ही ताकद मिळत आहे. समतेचे चक्र तुम्ही उलटे फिरवू शकत नाही. देशात महागाई वाढली आहे. महागाईदर १४.५५ टक्कांवर पोचला आहे. लोकांना दिवाळीत आनंदाचा शिधा मिळाला नाही. असे असताना नोटेवर कोणाचा फोटो हवा यावर वाद रंगविले गेले. आधी नोटा द्या मग वाटेल त्याचा फोटो छापा. असे स्पष्ट बोललो तर ईडीची बिडी लगेच पेटते, असा प्रहारही त्यांनी विरोधकांवर केला.

Chhagan Bhujbal
Shivsena: मशाल चिन्हावर विजयी झालेले छगन भुजबळ हे शिवसेनेचे पहिले आमदार

ईडीच्या चौकशीत कधीही भाजपच्या लोकांची नावे येत नाहीत. भाजपत केला की त्याच्या मागील तपास यंत्रणांचा फेरा थांबतो. भाजप म्हणजे लॉन्ड्री मशीन आहे. ईडीची कारवाई केली जाते कारण त्यात लवकर जामीन होत नाही. राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यावर संकट आल्यास ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांना एकटे सोडत नाहीत. त्यामुळे पवारांच्या घरावरही एसटी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. आतातर त्यांचीच सत्ता आली आहे. करा एसटीचे विलनिकरण. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेचे काम बंद पडले, फॉक्स कॉन व टाटा एअर बस सारखे प्रकल्प गुजरातला नेले आहेत. त्यांनी फॉक्सकॉन नेला आणि आम्हाला पॉप कॉन दिला असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com