

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे.
या यादीत शहराध्यक्ष, माजी महापौर आणि 9 माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
महाविकास आघाडीची वाट न पाहता काँग्रेसने यादी जाहीर केल्याने आघाडीतील अन्य पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
Solapur, 27 December : सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने वीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात एक माजी महापौर, शहराध्यक्ष यांच्यासह नऊ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडी होण्याची वाट न पाहता पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. आता आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोणती भूमिका घेतात, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वपक्षीयांकडून उमेदवारी यादीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. भाजपची यादी पहिल्यांदा जाहीर होईल असे वाटत असतानाच काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. एकीकडे महाविकास आघाडीसंदर्भात बोलणी सुरू असतानाच काँग्रेसने आपल्या उमेदवारांना प्रचाराचा अधिकचा वेळ मिळावा, यासाठी पहिली यादी जाहीर केली आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली निवड मंडळाच्या बैठकीत सोलापूरच्या यादीला मंजूर देण्यात आली आहे. त्यानुसार सोलापूर महापालिकासाठी काँग्रेस पक्षाने वीस जणांची पाहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्याच यादीत शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांची सून सीमा यलगुलवार, माजी महापौर आरीफ शेख यांच्या पत्नी सबा परवीन शेख यांचा समावेश आहे.
काँग्रेस पक्षाची प्रभागनिहाय यादी पुढीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक ९ अ : दत्तू नागप्पा बंदपट्टे
प्रभाग क्रमांक ११ ड : धोंडप्पा गोविंदप्पा तोरणगी
प्रभाग क्रमांक ११ ब : सबा परवीन आरिफ शेख
प्रभाग क्रमांक १४ ब : शोएब अनिसूर रेहमान महागामी
ड) बागवान खलिफा नसीम अहमद बशीर अहमद
प्रभाग क्रमांक १५ क : चेतन पंडित नरोटे
प्रभाग क्रमांक १५ ड : मनीष नितीन व्यवहारे
प्रभाग क्रमांक १६ ब : फिरदोस मौलाली पटेल
क) सौ. सीमा मनोज यलगुलवार
ड) नरसिंग नरसप्पा कोळी
प्रभाग क्रमांक १७
अ : शुभांगी विश्वजीत लिंगराज
ब) परशुराम छोटूसिंग सतारेवाले
ड) वहिद अब्दुल गफूर बिजापूरे
प्रभाग क्रमांक २०
अ : अनुराधा सुधाकर काटकर
प्रभाग क्रमांक २१
अ : प्रतीक्षा प्रवीण निकाळजे
क) किरण शीतलकुमार टेकाळे
ड) रियाज इब्राहिम हुंडेकरी
प्रभाग क्रमांक २२
अ) संजय चन्नवीरप्पा हेमगड्डी
क) राजनंदा गणेश डोंगरे
प्रभाग क्रमांक २३
ब) दीपाली सागर शहा
Q1. काँग्रेसने किती उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे?
काँग्रेसने सोलापूर महापालिकेसाठी 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
Q2. या यादीत कोणती प्रमुख नावे आहेत?
शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी आणि सीमा यलगुलवार यांचा समावेश आहे.
Q3. महाविकास आघाडीबाबत काँग्रेसने काय भूमिका घेतली आहे?
आघाडीची प्रतीक्षा न करता काँग्रेसने स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर केले आहेत.
Q4. पुढे कोणत्या पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या निर्णयाकडे लक्ष आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.