Samarjit Ghatage Latest News : बंडाचे निशाण फडकवण्याआधी समरजित घाटगेंनी दाखवला 'ट्रेलर'

Samarjit Ghatage : घाटगे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून टीझर लॉन्च करून पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासह महायुतीला चॅलेंज दिले आहे.
Samarjit Ghatge
Samarjit GhatgeSarkarnama
Published on
Updated on

Samarjitsingh Ghatage : भाजप नेते समरजित घाटगे यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्या संदर्भात चर्चा होत असताना घाटगे यांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. महायुतीवर त्यांनी नाराजी दाखवत वेगळी वाट धरणार असल्याची चर्चा गेल्या दहा दिवसापासून आहे.

अशातच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्यानंतर त्यांची महायुतीमध्ये कोंडी निर्माण झाली. त्यामुळे घाटगे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच आता घाटगे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून टीझर लॉन्च करून पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासह महायुतीला चॅलेंज दिले आहे.

या टीझरमध्ये घाटगे Samarjitsingh Ghatage यांनी आपल्या मतदारसंघात झालेल्या भाषणाची क्लिप व्हायरल केली आहे. त्यामध्ये त्यांनी लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या 2009 च्या विधानाचा दाखला दिला. "मला माझं स्वतःच एकतर मतदान पडेल का? त्यासाठी मी उभारणार आहे." असे म्हणत यंदाची विधानसभा (Vidhansabha) तुम्ही सर्वांनी हातात घ्यायची आहे.

ते रोज माझ्यावर टीका करतात आणि मी त्यांच्यावर टीका करायची. पण ही निवडणूक कोणाला पाडण्याची नाही. आपण जेंव्हा जिंकतो तेव्हा संविधानमध्ये कोणतर पडणार. कोणाला पाडण्यासाठी ही निवडणूक नाही. हे निवडणूक कागलच्या (Kagal Constituency) विकासासाठी आणि भविष्यासाठी ही निवडणूक आहे', असे घाटगे यांनी या व्हिडिओमधून स्पष्ट केले आहे.

Samarjit Ghatge
Badlapur Sexual Abuse Case : बदलापूर घटनेनंतर सरकारला खडबडून जाग; शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय!

पुढे म्हणतात, जगाची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी असली तरी हा समरजित घाटगे त्यांच्याविरोधात उभारणार आणि परिवर्तन घडवणार. हे परिवर्तन घडवण्यासाठी कितीहीवेळ लागू दे, कितीही किमंत मोजावी लागू दे, काही पावले उचलावी लागली तर उचलली जातील. असा इशारा महायुती आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना देत परिवर्तनासाठी काही निर्णय घ्यावे लागले तर मी घेईन. मी ही निवडणूक जनतेसाठी लढतोय. मला आपल्या लोकांची साथ हवी आहे. असे आवाहन घाटगे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com