Sangli News : सांगलीचा अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; हितचिंतकांनी अफवेची दवंडी पिटली, तर ACBने तडजोडी केल्याची चर्चा

Sangli Municipal Corporation : यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये कुपवाड शहर नगररचना विभागातील शाखा अभियंता आल्ताफ मकानदार याला लाच घेताना अटक झाली होती. त्याच मालिकेतील हा शाखा अभियंता असल्याने त्याच्यावरील कारवाईची बातमी वेगाने व्हायरल झाली. सायंकाळपर्यंत त्याची खातरजमा करण्यासाठी वृत्तपत्र कार्यालयांना फोन येत होते.
Sangli Municipal Corporation | ACB Bribery Rumors
Sangli Municipal Corporation | ACB Bribery RumorsSarkarnama
Published on
Updated on

Sangli News, 09 Jun : सांगली महानगरपालिकेतील प्रमुख पदावरचा अधिकारी लाच लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला असल्याची चर्चा शहरात चांगलीच गाजली. इतकेच नव्हे तर काही माध्यमांमध्ये त्याच्या बातम्याही पाहायला मिळाल्या. संबंधित अधिकाऱ्यांवर डोळा ठेवून बसलेल्या हितचिंतकांनी या बातमीची दवंडी जिल्ह्यात पिटली.

संबंधित अधिकाऱ्याला अटक करून एसीबीने छापा टाकला असल्याचं सांगण्यात आले. मात्र त्याला दिवसभर कोणत्याही अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही. त्यामुळे खरंच अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडला की तडजोडी झाल्या याची चर्चा जिल्ह्यात जोरात सुरू होती. महानगरपालिकेतील नगर रचना विभागाचे शाखा अभियंता यांच्यावरील कथित लाचलुचपत विभागाच्या कारवाईची आज जोरदार चर्चा झाली.

समाज माध्यमांवरूनही त्याची दिवसभर चर्चा सुरू होती. त्याला कोणीच अधिकृत दुजोरा मात्र देत नव्हते. याबाबतची अधिक माहिती अशी, संबंधित शाखा अभियंता एका तक्रारीसाठी एसपी ऑफिसला बोलावल्याचे सांगून ते बाहेर पडले. ही वार्ता त्याच्या एका हितचिंतकाच्या कानी पडली. त्याने तत्काळ त्याची माहिती एकाला देताना त्याला एसीबी ऑफिसला बोलावल्याचे सांगितले.

Sangli Municipal Corporation | ACB Bribery Rumors
Aurangabad DCC Bank : अब्दुल सत्तारांना सर्वात मोठा धक्का : औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीत समीर सत्तारांचा अर्ज बाद

दुसऱ्याने तीच बातमी महापालिकेच्या कॅन्टीनमध्ये पुण्याच्या एसीबी पथकाने छापा टाकून अटक केल्याची अधिकची जोड देत सांगितले. सकाळी साडे अकराच्या सुमारास ही वार्ता पालिका वर्तुळात पसरली. सर्वांनी त्या शाखा अभियंत्याचा फोन डायल करून खातरजमा करण्यास सुरुवात केली. मात्र, फोन स्वीच ऑफ होता. दुपारी तीनच्या सुमारास त्या अभियंत्याचा फोन सुरू झाला आणि काही झालेच नसल्याचे तो सांगू लागला. फोन स्वीच ऑफ का?, याची विचारणा केली असता 'हॉस्पिटलमध्ये नातलगाला भेटायला गेलो होतो, त्यामुळे फोन बंद होता', असा खुलासा त्याने केला.

दरम्यान, त्याच्या विरोधात तक्रार केलेल्या अनेकांनी मनोमन आनंदोत्सवही साजरा केला; मात्र असे काही झाले नसल्याचा खुलासा झाल्यानंतर त्यांच्या आनंदावर विरजण पडले. या शाखा अभियंत्यास सप्टेंबर २०२५ मध्ये कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तत्कालीन आयुक्त सत्यम गांधी यांनी सहा कनिष्ठ अभियंत्यांवर प्रत्येकी दोन हजारांच्या दंडाचा आदेश दिला होता.

Sangli Municipal Corporation | ACB Bribery Rumors
Nashik MLC Election : किशोर दराडे थेट गितेंच्या घरात, बंद दाराआड तासभर चर्चा.. ; बाहेर आल्यावर सगळं सांगितलं..

यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये कुपवाड शहर नगररचना विभागातील शाखा अभियंता आल्ताफ मकानदार याला लाच घेताना अटक झाली होती. त्याच मालिकेतील हा शाखा अभियंता असल्याने त्याच्यावरील कारवाईची बातमी वेगाने व्हायरल झाली. सायंकाळपर्यंत त्याची खातरजमा करण्यासाठी वृत्तपत्र कार्यालयांना फोन येत होते. एसीबी पथक बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याने 'काही तडजोड तर झाली नाही', अशीही काही मंडळी शंका व्यक्त करीत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com