Maan Political News : दुष्काळी उपाय योजना करा; अन्यथा, प्रशासनास फिरणे मुश्कील करू...प्रभाकर देशमुख

Maan Morcha शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी पक्ष व संघटनांनी माण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
Maan All Party andolan
Maan All Party andolansarkarnama
Published on
Updated on

-रूपेश कदम

Maan Political News : माण तालुक्यात दुष्काळी गावे जाहीर करून त्यावर तातडीने उपाययोजना करा. शेतीसाठीच्या पाण्याच्या आवर्तनातील मनमानी थांबवा, आदी मागण्याबाबत शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत. अन्यथा प्रशासनाचे रस्त्यावर फिरणे मुश्कील करू, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या Farmers विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी पक्ष व संघटनांनी माण तहसील Maan taluka कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख, काँग्रेसचे एम. के. भोसले, रासपचे बबन वीरकर, स्वाभिमानीचे अनिल पवार, राष्ट्रवादीचे बाळासाहेब सावंत, राजेंद्र साळुंखे, तानाजी कट्टे, राजू मुळीक, विष्णुपंत अवघडे, दिलीप तुपे, सूर्यभान जाधव, शहाजी बाबर, विक्रम शिंगाडे, सुरेंद्र मोरे, महेश जाधव, बाळासाहेब काळे आदी उपस्थित होते.

मोर्चेकऱ्यांनी ‘पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, जाहीर जाहीर करा, दुष्काळ जाहीर करा, माती चोरांवर गुन्हे दाखल करा,’ आदी घोषणांनी शहर दणाणून सोडले. माण तालुक्यात दुष्काळी गावे जाहीर करून त्यावर तातडीने उपाययोजना करा. शेतीसाठीच्या पाण्याच्या आवर्तनातील मनमानी थांबवा.

बेकायदेशीररीत्या तलावातून केल्या जाणाऱ्या माती चोरीवर निर्बंध आणा. माती चोरांवर गुन्हे दाखल करा. गाळमुक्त धरण योजनेत पारदर्शकता आणा. तत्काळ चारा डेपो, छावण्या सुरू करा. जिल्हा कालवा समितीत लाभक्षेत्रातील शेतकरी प्रतिनिधी घ्यावा. मराठा आरक्षण लागू करा. पानवण येथील पीडित महिलेला न्याय द्या, अशा मागण्या करण्यात आल्या. सोलापूर येथे धनगर बांधवास केलेल्या मारहाणीचा निषेध करून धनगर आरक्षण तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली.

Edited By Umesh Bambare

Maan All Party andolan
Maan News : माण, खटावला दुष्काळ जाहीर करण्यासाठी 'स्वाभिमानी'ने अडवला रस्ता

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com