Palus Kadegaon Assembly Constituency: विश्वजित कदम 'हॅट्ट्रिक' करणार की संग्राम देशमुख 'जायंट किलर' ठरणार ?

Vishwajit Kadam aiming for a hat-trick in Maharashtra elections: विश्वजीत कदम हे हॅट्ट्रिक करणार की संग्राम देशमुख त्यांची हॅट्ट्रिक रोखणार हे येत्या 24 तासांत स्पष्ट होणार आहे. एकंदरीतच पाहतात कदम आणि देशमुख यांच्या थेट लढाईत देशमुख पिछाडीवर पडल्याचे संकेत दिसत आहेत.
Vishwajeet kadam and sangram deshmukh
Vishwajeet kadam and sangram deshmukhSarkarnama
Published on
Updated on

Palus Kadegaon News : पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक ही चांगलीच चर्चेत राहिली. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात सत्तेवर मंत्रिपदावर राहिलेले आणि या मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून आलेले विश्वजीत कदम हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तर त्यांचा सामना भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांच्याविरोधात झाला.

विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) हे हॅट्ट्रिक करणार की संग्राम देशमुख त्यांची हॅट्ट्रिक रोखणार हे येत्या 24 तासांत स्पष्ट होणार आहे. एकंदरीतच पाहतात कदम आणि देशमुख यांच्या थेट लढाईत देशमुख पिछाडीवर पडल्याचे संकेत दिसत आहेत. 'साम' टीव्हीच्या 'एक्झिट पोल'नुसार विश्वजीत कदम हे या मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार होण्याचे संकेत मिळत आहेत.

पलूस कडेगाव या मतदारसंघात विश्वजीत कदम यांचं कार्यकर्त्यांचा असणारे संघटन, शिवाय वडील पतंगराव कदम (Patangrao Kadam) यांच्या विकास कामावरून प्रभावित असणाऱ्या मतदारांची संख्या, शिवाय संस्था यामुळे मतदारसंघावर पकड आहे. तर गेल्या पाच वर्षांत महायुतीच्या माध्यमातून व संग्राम देशमुख हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना मतदारसंघात झालेली विविध विकासकामे, ताकारी टेंभुसाठी दिलेले योगदान,लाभाच्या योजना त्यांनी मतदारांपुढे मांडल्या आणि विजयी करण्याचे आवाहन केले. शिवाय मतदारसंघात असणारा लाडक्या बहिणीचा प्रभाव आपल्याला विजय मिळेल असा विश्वास त्यांना वाटत आहे.

Vishwajeet kadam and sangram deshmukh
Karad North Assembly Election : बाळासाहेब पाटील परंपरा कायम ठेवणार, 'साम'चा सर्व्हे काय सांगतो ?

विश्वजीत कदम यांनी ताकारी टेंभू या सिंचन योजनांना आपण गती देऊ तसेच मतदारसंघात रोजगार निर्मिती अनुप, शिवाय गावोगावी विकास दर्जेदार देऊ अशा आश्वासाने प्रचारात आघाडी घेतली. तर संग्राम देशमुख यांनी युती शासनाने टेंभु,ताकारी योजनेला दिलेला निधी, तसेच गुहागर -विजापूर राष्ट्रीयमार्गाची कामे तसेच शेतकऱ्यांना दिलेली वीजबिल माफी,सन्मान निधी योजना,लाडकी बहीण योजना,गरिबांना घरे आदी शासनाने केलेली विकास कामे त्यांनी जनतेसमोर मांडली.

Vishwajeet kadam and sangram deshmukh
Saam Exit Poll 2024 : 'मविआ'तील फुटीचा फायदा शंभूराज देसाईंना होणार, पाटणकरांचा कौल कुणाला ?

मात्र, एकंदरीतच दुहेरी लढतीचा फायदा हा विश्वजीत कदम होण्याचे संकेत एक्झिट पोलनुसार दिसत आहेत. मात्र येत्या 24 तासांत निकाल स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच पलूस कडेगाव चा आमदार कोण? यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com