Prakash Ambedkar Video : गॅस टंचाई कुठे आहे? म्हणणाऱ्या भाजपला झटका! गुजरातमधून 3 लाख कामगार परतले, आंबेडकरांनी 'तो' व्हिडिओच दाखवला

Workers Return Gas Shortage BJP : गॅस टंचाईनुळे गुजरातमधून तीन लाख कामगार आपल्या गावी परतले असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar News : इराण-अमेरिका युद्धामुळे गॅस टंचाई असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून करण्यात येत होता. मात्र, कुठलीही टंचाई नाही, ही केवळ अफवा असल्याचे केंद्रातील भाजप सरकारकडून सांगण्यात येत होते. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवर गॅस टंचाईमुळे कामगार गुजरात सोडून जात असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. तब्बल तीन लाख कामगार गुजरात सोडून गेल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये व्हिडीओ पोस्ट करत, “अब नही आउंगा दोस्त”, असे म्हणत रेल्वे स्टेशनकडे पळत जाणाऱ्या कामगारांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या पोस्टमध्ये म्ह टले आहे की,स्वतःला “विश्वगुरु” म्हणवणाऱ्या पंतप्रधानांच्या राज्यातच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

'आतापर्यंत जवळपास 3 लाख मजूर आपापल्या गावी परत गेले आहेत. या परिस्थितीमुळे देशभरात रिव्हर्स मायग्रेशन वाढत आहे. जीवघेण्या उन्हात मजुरांना 24 तास रांगेत उभे राहावे लागत असून, एवढ्या प्रतीक्षेनंतरही त्यांना रेल्वेमध्ये बसण्यासाठी जागा मिळत नाही.', असे देखील त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचार व रॅलींमध्ये व्यस्त आहेत मात्र सामान्य जनता भुकेने त्रस्त आहे. “मुजरा मोदीच्या डान्सची किंमत देश चुकवत आहे,” अशा कठोर शब्दांत त्यांनी निशाणा साधला.

मोदी सरकारमुळे शेतकरी देशोधडीला

पंतप्रधान मोदीने अमेरिकेसोबत व्यापारी करार केलाय. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांसाठी असलेली बाजारपेठ अमेरिकेतील शेतकऱ्यांना खुली होईल. यातून मोठी स्पर्धा होईल. ब्राझीलची स्वस्त साखर भारतात आल्यावर व्यापारी लोकं त्या साखरेला प्राधान्य देतील अन त्यामुळे भारतीय साखरेला भाव मिळणार नाही. ज्याप्रमाणे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करत होता. कारण, परदेशातील कापूस भारतात येत होता, त्याच्याशी स्पर्धा भारतीय शेतकरी करू शकला नाही, त्यामुळे त्याने आत्महत्या केली. तशीच परिस्थिती ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर येईल.एपस्टिन फाईलमध्ये नाव आल्यामुळे पंतप्रधान मोदीने अमेरिकेसोबत करार केला आहे, ज्यामुळे इथला शेतकरी देशोधडीला लागणार आहे, अशी टीका देखील त्यांनी मोदी सरकारवर केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com