NCP News; अजित पवार समर्थकांनी दिले भाजपला चोख उत्तर

भाजपच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन,अजित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

जळगाव : (Jalgaon) राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या समर्थनार्थ व भारतीय जनता पक्षाविरोधात (BJP) राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे (NCP) आंदोलन करण्यात आले. या निमित्ताने गेले काही दिवस छत्रपती संभाजी महाराज या विषयावर आक्रमक झालेल्या भाजपला अजित पवार समर्थकांनी चोख उत्तर दिले. (NCP agitation against bjp in Jalgaon city)

Ajit Pawar
Jalgaon News; महापालिका आयुक्त कोण? पवार की गायकवाड?

येथील टॉवर चौकात भारतीय जनता पक्षाविरोधात घोषणा देण्यात आल्या, तसेच भाजप नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक असे संबोधावे असे म्हटले होते. यावरून भाजपने त्यांना टिकेचे लक्ष्य केले होते.

Ajit Pawar
Dada Bhuse; भाजप नेत्यांकडून पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर स्तुतीसुमने

याबाबत पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभय्या पाटील म्हणाले, की अजितदादा पवार यांच्या व्यक्तव्याचा विपर्यास करून भाजपतर्फे अजितदादा यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले, पण भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासह देशातील महापुरुष, राष्ट्रपुरुषांविषयी वेळोवेळी बेताल व आक्षेपार्ह व्यक्तव्य करून महापुरुषांचा अवमान केला, त्यावेळेस भाजपचे नेते कोणत्या बिळात जाऊन लपले होते, असा सवाल त्यांनी केला.

भारतीय जनता पक्षाचे नेते सातत्याने महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून गैरसमज पसरवत खोटा व चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करून इतिहासाचे विकृतीकरण करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभय्या पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, नामदेव चौधरी, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, महिला महानगराध्यक्ष मंगलाताई पाटील, अशोक पाटील, संजय पवार, वाल्मीकमामा पाटील, वाय. एस. महाजन सर, लीलाधर तायडे, अमोल कोल्हे, पुरुषोत्तम चौधरी, ईश्वर राहणे, अभिलाषा रोकडे, इब्राहीम तडवी आदी कार्यकर्त्यांनी भाग घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com