Shirdi Sai Baba Temple: साई समाधी मंदिरातील हार फुलांवरील बंदी उठवावी; डॉ.पिपाडांची फडणवीसांकडे मागणी

BJP Rajendra Pipada: शिर्डी येथील साई समाधी मंदिरात हार-फुले नेण्यास गेल्या काही महिन्यांपासून बंदी घालण्यात आली आहे.
Shirdi Sai Baba Temple:
Shirdi Sai Baba Temple:Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: फुल उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी साई समाधी मंदिरात हार फुलांवर घातलेली बंदी उठवावी, अशी मागणी भाजप नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी केली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन पिपाडा यांनी निवेदन देत ही मागणी केली.

शिर्डी येथील जगविख्यात साई मंदिरामध्ये दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यापैकी बहुतांश भाविकांच्या मनामध्ये फुले, हार, प्रसाद आदी वस्तू साईचरणी मनोभावे अर्पण करण्याची इच्छा असते. अनेक भक्तगण साईबाबांच्या समाधीला अर्पण केलेले पुष्पगुच्छ, हार प्रसाद म्हणून आपल्या सोबत घेऊन जातात. आपल्या घरात, देव्हाऱ्यात ठेवतात. असे असतानाही संस्थान प्रशासनाने आडमुठी भूमिका घेऊन यावर बंदी घातली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shirdi Sai Baba Temple:
Modi Sarkar Achievement : मोदी सरकारचे 'हे' कार्य सुवर्णक्षरांनी लिहिण्यासारखे; काँग्रेसच्या तुलनेत मोठी झेप..

ही बंदी म्हणजे साईभक्तांच्या भावनांचा अपमान आहे. फुले-हार बंदीच्या या तुघलकी निर्णयाचा वरवंटा शिर्डी परिसरातील भूमिपुत्रांवरही फिरला आहे. शिर्डीमध्ये फुले-हार विक्रीच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत होती. परंतु हा संपूर्ण व्यवसायच कोलमडल्याने परिसरातील अनेक दशकापासून फुलशेती करणारे शेतकरी, पुष्पगुच्छ, हार बनवणारे कारागिर तसेच लहानमोठे अनेक विक्रेते यांच्या रोजी रोटीवरच आज संकट आले आहे.

शिर्डी संस्थानने साईसमाधी मंदिरात फुल-हार नेण्यास बंदी घातल्याने हजारो लोकांचा रोजगार गेला आहे. यातून फुल उत्पादक शेतकरी आणि फुलविक्रेता यांच्या व्यवसाय बुडाला आहे. या प्रश्नावर अर्ज, निवेदने तसेच आंदोलनेही करून झाली आहेत. महाराष्ट्रातील इतर कोणत्याही मंदिरामध्ये, असे निर्बंध नाहीत. मग फक्त साई मंदिरातच हे निर्बंध का? असा प्रश्न शिर्डी परिसरातील नागरिक विचारत आहेत.

परंतु गोरगरीबांच्या प्रश्नाबद्दल गंभीर नसलेल्या प्रशासनाने याबाबतीत आडमुठी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे शिर्डी पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये मोठा रोष तयार झाला असून त्याच उद्रेक कधीही होऊ शकतो, अशी स्थिती असल्याकडे पिपाडा यांनी निवेदनातून लक्ष वेधले आहे.

शिर्डी येथील साईमंदिर आंतरराष्ट्रीय दर्जा असलेले तीर्थक्षेत्र आहे. तशी शिर्डीची देखील ओळख झाली आहे. साई मंदिर अस्तित्वात असल्यापासून साईबाबांच्या समाधीवर फुले, हार वाहण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. कोविड महामारीच्या काळात देशतील सर्वच तीर्थक्षेत्रांवर हार, फुले वाहण्यावर निर्बंध लावले गेले होते. कालांतराने निर्बंध उठविण्यातही आले. परंतु शिर्डीचे देशातील एकमेव मंदिर आहे की जेथे आजपर्यंत फुल, हार वाहण्याची बंदी कायम आहे.

येथील गुलाबाची शेती करणाऱ्या शेतकर्‍यांची उपजीविका फुल-हारावर अवलंबून असल्याने संस्थान प्रशासनाने फुल-हारावर लावलेली बंदी तात्काळ उठवण्यात यावी, अशी मागणी डाॅ. पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याची माहिती पिपाडा यांनी दिली.

(Edited By Ganesh Thombare)

Shirdi Sai Baba Temple:
Marathwada Shivsena News: शिंदेंच्या शिवसेनेत चाललंय काय ? निधी वाटपात पालकमंत्रीच घालतायेत खोडा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com