
जळगाव : हिंदू देवदेवता (Hindu GODS) व राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक (Insulting Statement) वक्तव्य व टिंगलटवाळी करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचा निषेध करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई (Leagle action) करावी अशी मागणी विविध हिंदूत्ववादी संघटनांनी केली. (Hindutwvadi organisation`s agitation against Shivsena leader in Jalgaon)
याबाबत बुधवारी छावा संघटनेसह विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. अंधारे यांनी नाशिक जिल्ह्यातील एका जाहीर सभेत भारतरत्न, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी एकेरी शब्दांत उल्लेख करीत या सर्व राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, अण्णा हजारे व इतरही अनेक सन्माननीय व्यक्तींविषयी अवमानकारक वक्तव्य करून त्यांच्या नकला व मिमिक्री करून त्यांचा अपमान केला आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
याचा विचार करता अंधारे यांचा विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व जळगाव जिल्ह्यातील नागरिक जाहीर निषेध नोंदवीत आहेत. अंधारे यांनी केलेले बेताल वक्तव्य व पसरविलेल्या विषवल्लीबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करावा. तसेच कुठलेही वादग्रस्त वक्तव्य करू नये, जेणेकरून जिल्ह्याची शांतता भंग होऊन सामाजिक सलोखा बिघडेल आणि आजतागायत वादग्रस्त वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, बंडूदादा काळे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र कोळी, राहुल ठाकरे, दिनेश भोळे, योगेश काळे, नीलेश पाटील, भीमराव सोनवणे, आकाश घेंगट आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
------
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.