Nashik NMC News: महापालिकेत सुरू झाला टक्केवारीचा खेळ?, त्रस्त ठेकेदार पोहोचले थेट आयुक्तांच्या दारी!

Nashik BJP NMC Corporators Percentage Contractor Grievance Commissioner-सत्ताधारी बाहुबली नगरसेवकांवर देवाभाऊंच्या इशाऱ्याचाही प्रभाव पडेना, कंत्राटदारांना वेठीस धरल्याच्या तक्रारीने खळबळ!
NMC_Buildings
NMC_BuildingsSarkarnama
Published on
Updated on

Nashik NMC News: शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे थेट कुंभमेळा कक्षातून मंजूर झाली आहेत. मात्र आता महापालिका क्षेत्रातील ही कामे वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहेत. 

नाशिक शहरात लोकनियुक्त प्रतिनिधींची सत्ता स्थापन झाली आहे. महापालिकेतील बहुतांशी महत्त्वाच्या पदांवर महायीतचे नगरसेवक विराजमान आहेत. मात्र आता शहरातील काही नगरसेवक वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत.  

सिंहास्थ कुंभमेळ्याच्या आठ किलोमीटर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. महापालिका कंत्राटदाराने हे काम सुरू करताच त्यात परिसरातील नगरसेवकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. नगरसेवक आणि त्यांचे समर्थकांनी थेट टक्केवारी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

NMC_Buildings
G. Shrikant Transfer News : मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी भाजप नगरसेवकांची मागणी धुडकावली? ताकद लावूनही महापालिका आयुक्तांची बदली रोखण्यात अपयश

यासंदर्भात एका कंत्राटदाराने थेट प्रकल्प अभियंत्यांसह महापालिका आयुक्तांच्या कानावर घडलेला प्रकार टाकला. या कंत्राटदाराचे संबंध थेट वरपर्यंत असल्याने तो हे धाडस करू शकला. नगरसेवक त्रास देत असल्याची तक्रार त्यांने केली आहे.

NMC_Buildings
Kolhapur Mahapalika: 2002 मध्ये निलंबित, 25 वर्षांपासून 1 लाख 60 हजार महिना 'फुकट'चा पगार; 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बाजार उठणार

महापालिकेचे प्रकल्प व्यवस्थापक सचिन मोरे यांनी याबाबत थेट महापालिका आयुक्त आणि शहराच्या पोलीस आयुक्तांना याबाबत कळविले. त्यामुळे या प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे. संबंधित नगरसेवक कोणत्या पक्षाचे आहेत, याचा उल्लेख मात्र त्यांनी पत्रात केला नाही.

याबाबतची माहिती थेट पोलीस आयुक्तांकडे पोहोचविण्यात आली आहे. त्यामुळे पुढे काय होते, याची राजकीय कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस संबंधित नगरसेवकांना चौकशीसाठी बोलावणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचा धसका अन्य नगरसेवकांनाही बसला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक दौरा झाला. त्यावेळी त्यांनी विकास कामांना गती देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. कामांमध्ये कोणीही अडथळे आणू नये, असेही त्यांनी बजावले होते, हे विशेष.

मात्र मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेकडे पंचवटीतील बाहुबली नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते.आर्थिक मोह सुटत नसल्याने त्यांनी थेट कंत्राटदाराला त्रास देण्याचा प्रकार महापालिकेत नवा नाही. मात्र यामुळे धाास्तावलेल्या या कंत्राटदारांनी थेट महापालिका प्रशासनाकडे आपली व्यथा मांडल्याने हा प्रकार चर्चेत आहे. या पत्राबाबात महापालिका प्रशासनाने मात्र दुजोरा दिला नाही. 

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com