विरोधकांनी अडथळे आणले तरी भाजपचा वारू थांबणार नाही

शिंदखेडा शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण झाले.
Jaykaumar Rawal, BJP leader
Jaykaumar Rawal, BJP leaderSarkarnama
Published on
Updated on

शिंदखेडा : शहरात विकासाची घोडदौड सुरू असून, विरोधकांनी कितीही अडथळे आणले, तरी विकासाची कामे सुरूच राहतील, असा दावा भाजप नेते, (BJP leader Jaykumar Rawal) माजी मंत्री जयकुमार रावल यांनी येथे केला.

Jaykaumar Rawal, BJP leader
काय बोलता?, प्राप्तिकर विभागाचे नवे टार्गेट `कांदा`

येथील भगवा चौकात रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण झाले. यावेळी ते म्हणाले की, नगरपंचायतीच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आला. शहरात पिण्याच्या पाण्यासाठी २१ कोटींची कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना, रस्त्यांसह कॉलनी परिसरात उद्याने, नाना-नानी पार्क झाले. शहरात प्रशासकीय इमारत, पोलिस ठाणे, पंचायत समिती इमारत, आदिवासी वसतिगृह या इमारती दिमाखाने उभ्या आहेत. बुराई नदी बारामाही झाली आहे. रस्त्यांचे चौपदरीकरण होत आहे.

Jaykaumar Rawal, BJP leader
गिरीश महाजन जळगावच्या मैदानात लढाईआधीच पराभूत झालेत का?

ते पुढे म्हणाले, शिंदखेड्यासाठी मुंबई रेल्वे सुरू झाली आहे. खानदेश एक्स्प्रेस तिचे नाव आहे. विरोधकांनी उगीचच विकासकामांना अडथळा आणून जनतेचे नुकसान करू नये. अलीकडच्या काळात विविध निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जातीय स्तरावर विखारी प्रचार केला जातो आहे. जनतेने त्यापासून सावध राहावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

शिंदखेडा शहरातून भगवा चौक ते कुमरेज रस्ता व शिंदखेडा ते चौगाव रस्त्यासाठी एकूण एक कोटी २० लाखांची कामे मंजूर झाली आहेत. याकामाचे भूमिपूजन रावल यांच्या हस्ते झाले. दोन महिन्यांत ही कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त केली. शिंदखेडा तालुक्यासाठी मंत्री असताना नव्वद ते शंभर कोटी निधी मंजूर करण्यात आलेला होता. मात्र राज्यातील शासन बदलल्याने त्यांनी हा निधी थांबविला आहे. याबाबत आपण संबंधित मंत्र्यांशी अनेकदा चर्चा केली आणि निधीची मागणी केली आहे. मात्र स्थानिक स्तरापासून वरिष्ठ स्तरापर्यंत विरोधक विकासकामांशी राजकारण करीत आहेत.

यावेळी भाजपचे धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्षा कुसुम निकम, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रजनी वानखेडे, कामराज निकम, पंचायत समिती सभापती वैशाली सोनवणे, पंचायत समितीचे उपसभापती नारायणसिंग गिरासे, जिल्हा परिषद सदस्य सत्यभामा मंगळे, गटनेते अनिल वानखेडे, नगरसेविका मीरा पाटील यांच्यासह कार्यकारी अभियंता दीपक बांगर आणि उपकार्यकारी अभियंता जे. डी. पाटील उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com