MLA Dhanorkar News : राजीव गांधींचे निधन झाले, तेव्हा राहुल तुमच्या मुलांपेक्षाही छोटा होता, म्हणताना सोनिया गांधींचेही डोळे पाणावले...

Soniya Gandhi : गांधी कुटुंबीय तुमच्या पाठीशी आहे.
Dhanorkar Family with Soniya and Rahul Gandhi.
Dhanorkar Family with Soniya and Rahul Gandhi.Sarkarnama

Sonia Gandhi gave courage to the Dhanorkar family : मी अशा कठीण प्रसंगातून गेली आहे. राजीव गांधींचे निधन झाले तेव्हा राहुल तुमच्या मुलांपेक्षा राहुल छोटा होता. धीर सोडून नका. गांधी कुटुंबीय तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दांत सोनिया गांधींनी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे सांत्वन केले. त्यांना मायेने जवळ घेतले. त्यावेळी आमदार धानोरकर गहिवरल्या आणि सोनिया गांधींचेही डोळे पाणावले. (MLA Dhanorkar was deeply moved and Sonia Gandhi's eyes also shed tears)

या भावून प्रसंगाच्या वेळी राहुल गांधीसुद्धा उपस्थित होते. राज्यातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले. ते रुग्णालयात असताना आणि त्यांच्या निधनानंतर राहुल गांधी धानोरकर कुटुंबीयांच्या संपर्कात होते. त्यांना आज शुक्रवारी (ता. ७) भेटीसाठी दिल्ली येथे बोलाविले होते.

सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत आमदार प्रतिभा धानोरकर, त्यांचे दोन्ही मुलं मानस आणि पार्थ, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, प्रवीण काकडे उपस्थित होते. याप्रसंगी राहुल गांधी यांचीही उपस्थिती होती. आमदार धानोरकर यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा सारा घटनाक्रम सांगितला. धानोरकरांच्या निधनानंतरची परिस्थिती कथन केली. त्यावेळी सोनिया गांधींनी त्यांच्यावरही अशी वेळ आली होती, याची आठवण करून दिली.

तुमच्या मुलांपेक्षाही तेव्हा राहुल लहान होते. मलाही खूप त्रास झाला, याची आठवण करून दिली. आमदार धानोरकर आणि दोन्ही मुलांना मायेने जवळ घेतले. गांधी कुटुंबीय तुमच्या नेहमी पाठीशी राहिली. कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क साधा, असे सांगितले. राहुल गांधींनी स्वीय साहाय्यकाचा आणि स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आमदार धानोरकरांना (Pratibha Dhanorkar) दिला. कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क साधण्यास सांगितले.

Dhanorkar Family with Soniya and Rahul Gandhi.
Pratibha Dhanorkar : खासगी शाळांतील गणवेशांचा बोझा पालकांना न परवडणारा !

राजकारण (Politics) होतच राहील. मुलं लहान आहेत, त्यांची काळजी घ्या, असा सल्लाही सोनिया गांधींनी (Soniya Gandhi) दिला. आमदार धानोरकरांना सोनिया गांधींना मायेने जवळ घेतले. तेव्हा त्यांचा बांध फुटला. गांधींचेही डोळे पाणावले. बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) राज्यातील एकमेव खासदार असल्यामुळे धानोकरांचा सोनिया गांधीशी थेट संपर्क होता. त्या त्यांना नावानिशी ओळखत होत्या. आठ महिन्यांपूर्वीच धानोरकर दांम्पत्यांने सोनिया गांधींची भेट घेतली होती.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com