
There were voices of displeasure from the activists : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विदर्भात फारसे वर्चस्व नाही. एके काळी अमरावती जिल्ह्यात पक्षाची चांगली ताकद होती. विधानसभेचे माजी उपसभापती शरद तसरे, हर्षवर्धन देशमुख, सुनील वऱ्हाडे आदी नेते ‘फार्मात’ होते. पण आज ती स्थिती नाही. अजित पवारांनी बंड पुकारल्यानंतर परवा (ता. १५) राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा घेण्यात आला. (At one time the party had good strength in Amravati district)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तेची कास धरल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत पहिल्यांदाच शरद पवार यांच्या समर्थनार्थ शनिवारी पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांकडून नाराजीचे सूर उमटले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समोरच अनेक जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाच्या कार्यशैलीवर उघडपणे नाराजी दर्शविली.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या समर्थनार्थ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन देशमुख, माजी विधानसभा उपसभापती शरद तसरे, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, विजय काळे, गणेश रॉय, संगीता ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्याच्या सुरुवातीलाच निमंत्रणावरून अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच तालुकाध्यक्षांना विश्वासात न घेता जिल्हास्तरावर अनेक निर्णय आणि नियुक्त्या केल्या जात असल्याची तक्रार काही तालुकाध्यक्षांनी जाहीरपणे केली.
केवळ शरद पवार यांच्यावरील निष्ठेमुळेच आम्ही पक्षात असून पदाधिकाऱ्यांनी आपल्याला गृहीत धरता कामा नये, असा थेट इशारा काही पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावरून दिला. मात्र व्यासपीठावरील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सबुरीचा सल्ला दिल्यानंतर मेळावा सुरळीत पार पडला. मेळाव्याला अरुण गावंडे, गणेश रॉय, सुभाष पावडे, अनिल ठाकरे, विजय काळे, अजिज पटेल, नाना बोंडे, वृषाली विघे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पवार पुन्हा पिंजून काढणार महाराष्ट्र..
येणाऱ्या काही दिवसांत पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि मतदारांशी संपर्क साधणार आहेत. आजच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा जनतेला वीट आला आहे. राज्यात (Maharashtra) महागाई, बेरोजगारीसारख्या गंभीर समस्या असताना सत्ताधाऱ्यांकडून खेळण्यात येत असलेल्या खेळीला जनता येणाऱ्या निवडणुकीत सडेतोड उत्तर देईल, असे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यावेळी सांगितले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.