Mumbai: मोदी सरकारने एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २०२४ च्या निवडणुकीतील विजयासाठी सर्व राजकीय समीकरणे जुळवण्यास सुरुवात केली आहे. तसेच भाजप नेत्यांकडून या निवडणुकीसाठी '४०० प्लस'चा नारा दिला जात आहे.
मात्र, अशातच 'कॅग'च्या अहवालात मोदी सरकारमधील सहा योजनांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सरकारच्या सहा योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यात नितीन गडकरींच्या खात्यावरही गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. याचवरुन काँग्रेसने भाजपमध्ये वादाची ठिणगी टाकली आहे.
विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कॅगच्या अहवालावरुन केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या मुद्द्यावर भाष्य करावं काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तर, नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठीच कॅगचा अहवाल आला असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
'' गडकरींचं राजकारण संपवायचा डाव...''
विजय वडेट्टीवार म्हणाले, नितीन गडकरीं(Nitin Gadkari)चा काटा काढायचा असून हे अंतर्गत राजकारण आहे. कदाचित त्यामागची पार्श्वभूमी असू शकते. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार असताना कॅगने फक्त गडकरींच्या खात्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यावरून सर्व काही स्पष्ट होतं. गडकरींची प्रतिमा स्वच्छ आहे. विकासाची आहे. त्यातून त्यांना साईड ट्रॅक करायचं. त्यांचं राजकारण संपवायचं हा डाव असू शकतो असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
केंद्रात मोठा भ्रष्टाचार
मोदी सरकारमधील सर्वात चर्चेतले आणि नवनवीन संकल्पना राबवत विकासकामांमध्ये सर्वच पक्षांच्या नेत्यांचे कौतुक मिळवणाऱ्या नितीन गडकरींच्या खात्यावरचं कॅगने ताशेरे ओढल्यानंतर राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याचवेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केले आहे.
ते म्हणाले, गडकरींच्या खात्यांवर गंभीर पण पंतप्रधान हे रस्ते समितीचे अध्यक्ष असतात. मग पंतप्रधानांची भूमिका काय हा प्रश्न उपस्थित होतो. केंद्रात मोठा भ्रष्टाचार आहे. आता जे आलं त्यावर केंद्र सरकार काय कारवाई करेल हे पाहणार आहोत असंही ते म्हणाले.
...त्यामुळे कमळाचं बटन कोणी दाबेलच का ?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekahr Bawankule) यांच्या बटन दाबण्यासाठी जातील तेव्हा मत भाजपलाच मिळेल असं विधान केले होते. त्यावर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले, एवढा आत्मविश्वास येतो कुठून? महागाई वाढली आहे. सीएनजी वाढला आहे. बेरोजगारी आहे. सामान्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे कमळाचं बटन कोणी दाबेलच कसं? म्हणजे यात काही तरी गोलमाल आहे. पुन्हा कमळालाच मतदान जात असेल तर देशाला धोका होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.