Kalyan-Dombivli News : पोलिसांना विचारला जाब ; ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखासह 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Police News : ठाकरे गच्या वतीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर रविवारी 20 ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला होता.
neeraj kumar News
neeraj kumar News Sarkarnama
Published on
Updated on

Kalyan-Dombivli Crime News : कल्याणमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले होते. युवा सेना (Shivsena) शहरप्रमुख नीरज कुमार यांनी त्यावेळी केलेल्या भाषणात पोलिसांच्या कार्य शैलिवर प्रश्न उपस्थित केले होते. पोलिसांविरोधात भाषण करत टीका केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुख नीरज कुमार, अनिल तिवारी, शेखर पिसाळ, सूर्या सिंग यांसह 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कल्याण (Kalyan-Dombivli) पूर्वेत एका 12 वर्षीय मुलीची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या करण्यात आली होती. यामध्ये आदित्य कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गच्या वतीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर रविवारी 20 ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा पोलीस ठाण्याच्या आवारात पोहोचला असता त्याठिकाणी शिवसैनिक आणि महिला पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडला. नीरज कुमार यांनी भाषण केले. हे भाषण पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणारे होते.

neeraj kumar News
Thane politics News : ठाण्यात ठाकरेंची कसरत ; या नगरसेवकांनो 'परत फिरा रे...' साद घालावी लागणार ?

नीरज यांनी कल्याणमध्ये क्राईम वाढले आहेत. आम्ही करदाते नागरीक आहोत. आमची सुरक्षा करणे पोलीसांचे कर्तव्य आहे. त्या बदल्यात पोलिसांना (Police) पगार मिळतो. पोलिसांना किती हप्ता पाहिजे ? पगार पुरत नसेल तर आम्ही लोकवर्गणी काढून पैसे देऊ, अशी विधाने केली होती.

neeraj kumar News
Rohit Pawar News : शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी काय केले हे मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना विचारावे : रोहित पवारांचा टोला

पोलिसांविरोधात भाषण करत टीका केल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Thane) ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखासह 40 कार्यकर्त्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com