Sanjay Raut : "राऊतांच्या अंगातलं उतरलं नाही, म्हणून 'मविआ' सरकार गेलं..."; विश्वजीत कदमांच्या 'त्या' वक्तव्याला राऊतांचं प्रत्युत्तर

Maharashtra Assembly Election 2024 : " "2019 ला सरकार येईल असं वाटतंच नव्हतं. पण 2019 ला महाविकास आघाडीचं सरकार बनलं. मी विनोदाने अनेकदा म्हणतो की, संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून सरकार बनलं. पण अडचण एवढी झाली की राऊतांच्या अंगातलं कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं."
Vishwajeet Kadam, Sanjay Raut
Vishwajeet Kadam, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 13 Nov : "संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून सरकार बनलं, पण राऊतांच्या अंगातलं कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं." असं वक्तव्य माजी राज्यमंत्री आणि पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी केलं आहे.

सांगली (Sangli) जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील प्रचार सभेत बोलताना कदम यांनी महाविकास आघाडी आणि संजय राऊतांबद्दल केलेल्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तर त्यांच्या याच वक्तव्याला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राऊत (Sanjay Raut) यांना विश्वजीत कदम sयांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "कदम यांनी अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं नसावं, त्यांना काय म्हणायचं आहे ते गोंधळलेल्या मनस्थितीत असावेत. अजित पवारांनी काल एक मुलाखत दिली आहे.

Vishwajeet Kadam, Sanjay Raut
Shivsena News: जोगेश्वरीत मोठा राडा! मध्यरात्री दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, VIDEO आला समोर

त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं सरकार पाडण्या संदर्भात बैठक झाली त्या बैठकीला अदानी हजर होते. त्यामुळे कुणाच्या अंगात आलं होतं हे त्यांनी एकदा नीट तपासलं पाहिजे. अडीच वर्ष आम्ही सत्ता चांगल्या प्रकारे राबवली."

Vishwajeet Kadam, Sanjay Raut
Sanjay Raut : पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांचा पाठिंबा, अजितदादांचा दावा राऊतांनी खोडून काढला

विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?

कडेगाव तालुक्यातील प्रचार सभेत बोलताना कदम म्हणाले, "2019 ला सरकार येईल असं वाटतंच नव्हतं. पण 2019 ला महाविकास आघाडीचं सरकार बनलं. मी विनोदाने अनेकदा म्हणतो की, संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून सरकार बनलं.

पण अडचण एवढी झाली की राऊतांच्या अंगातलं कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं. महाविकास आघाडीचं सरकार आलं. राहुल गांधी, सोनिया गांधींच्या आशीर्वादाने राज्यमंत्री झालो. सहा खाती मिळाली. पण दुर्दैवाने कोरोना सुरु झाला."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com