मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय असलेले ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. चारच दिवसांपूर्वी त्यांचा ९३ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. मुंबई येथील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी याबाबत माहिती दिली आहे. रमेश देव यांनी मराठी तसेच, हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. त्याच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. (Bollywood Actor)
“आनंद” आणि “ताकदीर” या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात. देव यांनी ‘अंधळा मागतो एक डोळा (१९५६) या चित्रपटातून करमणूक उद्योगात पदार्पण केले. त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट “आरती” होता. रमेश देव आणि त्यांच्या पत्नी सीमा देव यांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केले. या दोघांचे अनेक चित्रपट चांगलेच गाजले होते. १९६२ मध्ये त्यांनी वरदक्षिणा या चित्रपटादरम्यान दोघांचं एकमेकांवर प्रेम जडले. त्यानंतर त्यांनी त्याच वर्षी लग्न केले. या दोघांना अजिंक्य आणि अभिनय हे दोन मुले आहेत.
या वर्षी देव यांच्या लग्नाचे ६० वे वर्षे होते. देव यांनी आतापर्यंत २८० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले आहे. देव यांनी चित्रपटसृष्टीत आपला काळ गाजवला. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या स्टार्ससोबत काम केले. “दस लाख” (१९६६) चित्रपटात मनोहरची भूमिका केली होती. देव यांना ‘मुजर्मि’, ‘खिलोना’ आणि ‘जीवन मृत्यु’ या चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली. तसेच, “कोरा कागज” आणि “आखा दाव” चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ‘खुशी-दर’ (१९८२) चित्रपटात रामनाथनची भूमिका साकारली होती. त्यांचे पुढचे सिनेमे “औलाद” आणि “घायल”होते.
याबरोबरच देव यांना कौल साहबच्या रूपात २०१३ मध्ये “जॉली एलएलबी” चित्रपटात काम केले होते. 2016 मध्ये त्यांनी ‘घायल वन्स अगेन’ चित्रपटात काम केले होते. देव यांना लाइफ टाईम अवॉर्डिअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२६ रोजी अमरावती येथे झाला होता. देव यांचे आजोबा अभियंता होते. त्यांनी राजस्थानातील जोधपूर पॅलेसच्या उभारणीत मोठे योगदान दिल्याने कोल्हापूर शहराच्या उभारणीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी देव यांच्या आजोबांना निमंत्रित केले. त्यामुळे देव कुटुंब कोल्हापुरात स्थायिक झाले. त्यांचे वडील शाहू महाराजांचे कायदेशीर सल्लागार होते.
रमेश देव यांचे गाजलेले हिंदी सिनेमे...
आज़ाद देश के गुलाम, घराना, सोने पे सुहागा, गोरा, मिस्टर इण्डिया, कुदरत का कानून, दिलजला, शेर शिवाजी, प्यार किया है प्यार करेंगे, इलज़ाम, पत्थर दिल, हम नौजवान, कर्मयुद्ध, गृहस्थी, मैं आवारा हूँ, तकदीर, श्रीमान श्रीमती, दौलत, अशान्ति, हथकड़ी, खुद्दार, दहशत, बॉम्बे ऐट नाइट, हीरालाल पन्नालाल, यही है ज़िन्दगी, फकीरा, आखिरी दांव, सुनहरा संसार, ज़मीर, एक महल हो सपनों का, सलाखें, ३६ घंटे, प्रेम नगर, गीता मेरा नाम, कोरा कागज़, कसौटी, जैसे को तैसा, ज़मीन आसमान, जोरू का गुलाम, बंसी बिरजू, यह गुलिस्ताँ हमारा, हलचल, मेरे अपने, संजोग, बनफूल, आनन्द, दर्पण, खिलौना, जीवन मृत्यु, शिकार, सरस्वतीचन्द्र, मेहरबाँन या सिनेमांमध्ये काम केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.