दिग्दर्शिका रोशन बिंदरला फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक

अंधेरीतील यारीरोड-वर्सोवात राहणाऱ्या ५० वर्षीय तक्रारदार महिलेने रोशन विरोधात तक्रार दिली आहे.
दिग्दर्शिका रोशन बिंदरला फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक
Published on
Updated on

मुंबई : दिग्दर्शिका एकता कपूरच्या (Ekta Kapoor) टेलिव्हिजन शोचे टॉप डायरेक्टर रोशन बिंदर (Roshan Bindar) यांना फसवणूक प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. रोशन ही एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सचे माजी दिग्दर्शक दिवंगत गॅरी बिंदर यांची पत्नी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीतील यारीरोड-वर्सोवा परिसरात राहणाऱ्या ५० वर्षीय तक्रारदार महिलेने रोशन विरोधात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेच्या इमारतीमध्ये अभिनेता हितेन जेठानंद तेजवानी राहतो. तक्रारदार महिला हितेन व रोशन बिंदर या तिघांनी एक वेबसिरीज बनविण्याचा निर्णय घेतला. त्यात हितेनच्या सांगण्यावरुन तक्रारदार महिलेने ३७ लाखांची गुंतवणूक केली.

दिग्दर्शिका रोशन बिंदरला फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक
एकीकडे भाजपचे आंदोलन; दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पुढाकाराने भरले ५१ लाखांचे वीज बील!

द अदर्स (डी कोड) नावाची वेबसिरीज पूर्ण झाल्यानंतर त्याचे हक्क हार्ड डिस्क, उल्लू डिजीटल प्रायव्हेट लिमिटेड चॅनेलला विकायचे. त्यातून मिळालेली रक्कम समान वाटून घ्यायची, असा तिघांमध्ये व्यवहार झाला. त्यासाठी या तिघांच्या नावाने एक संयुक्त खाते उघडण्यात आले. मात्र बँकेत जमा झालेल्या या पैशांचा रोशन बिंदर यांनी परस्पर अपहार केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर संबंधित महिलेने वर्सोवा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रर दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी रोशन बिंदर हिला अटक केली आहे. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com