Sharad Pawar News : शरद पवार ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल

Sharad Pawar डॉक्टरांच्या सल्लानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रुटीन चेकअपसाठी मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

डॉक्टरांच्या सल्लानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

Sharad Pawar
Sudhir Mungantiwar : रवी राणा आणि बच्चू कडू, या दोघांच्याही भूमिकेचे स्वागत !

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. या पत्रकात, "आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. दि. 2 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल व दि. 3 नोव्हेंबर 2022 रोज शिर्डी येथे येणार असून पक्षाच्या दि. 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना रुग्णालयाच्या आवारामध्ये गर्दी करु नये असे आवाहन करण्यात येत आहे." असे या पत्रकात नमुद करण्यात आले आहे.

दरम्यान, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार येत्या 3 नोव्हेंबरला शिर्डी दौऱ्यावर जाणार आहेत. शिर्डीत होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबिरात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहितीही या पत्रकात देण्यात आली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com