
जून महिन्यातील ग्रहस्थितीचा विचार करता मे अखेरीस झालेल्या अतिवृष्टीनंतर, जूनच्या पूर्वार्धात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण राहील. १६ जूननंतर पुन्हा एकदा चांगली वृष्टी संभवते. जून ते १५ जुलै सर्वत्र मान्सून पोहोचण्याची शक्यता असून, कोकण, मुंबई, गोवा, गुजरात या पश्चिम किनारपट्टीवर वादळे, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळित होईल.
जून महिन्यात राहू-मंगळ कुयोग होणार असल्यामुळे पोलिस-लष्करासाठी कटकटीचा काळ राहील. पूर्वार्धात पुन्हा एकदा युद्धजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता राहील. सीमेवर तणाव वाढण्याची शक्यता असून, माओवादी, दहशतवादी संघटनांकडून हिंसा, स्फोटक घटना घडविण्याचे प्रमाण होतील. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याची शक्यता राहील. सीमेवर घुसखोरीचे प्रयत्न होतील. पोलिस, लष्करी जवानांवर हल्ले, अपघात, घातपाताच्या घटना या महिन्यात संभवतात. मोठे खेळाडू, मोठे अधिकारी, पोलिस किंवा लष्करी अधिकारी यांचे राजीनामे किंवा मृत्यूच्या घटना होण्याची शक्यता आहे. मात्र, या काळात देशाची प्रतिष्ठा, सन्मान वाढेल. जूनच्या उत्तरार्धात भारत-पाकिस्तान चर्चा होण्याची शक्यता असून काही अटी-शर्तींवर समझोता होईल. शस्त्रसंधीची घोषणा होईल.
११ जून ते ११ जुलैपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव राहणार असून, जुलैनंतर कोरोना आटोक्यात येईल. देशातील प्रमुख व्यक्तीचा सन्मान होईल. लेखक, साहित्यिक कलाकार, संशोधक, बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, गौरव होईल. परदेशातील स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना मोठे यश मिळेल. या काळात महत्त्वाची विधेयके मोठ्या गोधळात संमत होतील. विरोधी पक्षांचे रुसवे फुगवे अनुभवास येतील. राजकीय क्षेत्रात मोठ्या नाट्यमय घटना अनुभवास येतील. जूनमध्ये शेअर मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती राहील. मार्केटमध्ये बनावट तेजी येण्याची शक्यता असून, उत्तरार्धात सोन्या-चांदीच्या भावात तेजी राहील. आर्द्रा नक्षत्रात होणारी अमावस्या धार्मिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती लेखक, साहित्यिक, संशोधक, बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रतिकूल राहील. या क्षेत्रातील व्यक्तीच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात.
आठ जून रोजी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करणार असून, वाहन कोल्हा आहे. या नक्षत्राच्या पूर्वार्धात अल्पवृष्टी संभवते. तर, १६ जूननंतर मोठ्या पावसाने राज्याला मोठा दिलासा मिळेल. २१ जून रोजी सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करणार असून, वाहन उंदीर आहे. वरुण मंडळ असल्याने या नक्षत्रावर सर्वत्र चांगली पर्जन्यवृष्टी संभवते. अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण होईल. पाच जुलैपर्यंत मोठे पाऊस होतील. पूर्व, दक्षिण, पश्चिम भागात पावसाचे प्रमाण चांगले राहील. मात्र उत्तर भारतान उष्णता वाढणार असून, उत्तर भारतात जनजीवन विस्कळित होईल.
पूर्व, दक्षिण, पश्चिम भागात पावसाचे प्रमाण चांगले राहील. मात्र उत्तर भारतात उष्णता वाढणार असून, उत्तर भारतात जनजीवन विस्कळित होईल. या काळात मोठ्या विरोधी पक्षात फूट पडण्याची शक्यता असून, विरोधी आघाडीत फूट पडेल. काही राज्यांमध्ये सत्ताबदल, बंडखोरी, पक्षांतर यांसारख्या घटना अनुभवास येतील.
आगीच्या दुर्घटना, रेल्वे, वाहन अपघात यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता राहील.
या काळात मोठी विमान दुर्घटना, आगीचे अपघात, वीज पडून होणारे अपघात यातून मोठी जीवितहानी संभवते.
पुढील काळात घरांची पडझड, घरांवरील दरोडे, आगीच्या दुर्घटना वाढण्याची शक्यता राहील.
मेष : राशीतील शुक्राचा प्रवेश मन आनंदी, उत्साही ठेवणारा असून, तरुणांचे विवाह जमण्यासाठी अनुकूल काळ सुरू आहे. भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध होईल.
वृषभ : व्ययातील शुक्राचे भ्रमण मोठे प्रवास करण्यासाठी अनुकूल असून, उंची वस्तू, वाहन, वस्त्र, अलंकार यांच्या खरेदीसाठी खर्च होतील. नोकरीमध्ये चांगले बदल होईल.
मिथुन : लाभ स्थानातील शुक्र मोठे लाभ मिळवून देणारा असून, नवीन मित्र-मैत्रिणी भेटतील. शेअर्ससारख्या व्यवसायात फायदा होईल. षष्ठात होणारी पौर्णिमा आरोग्य बिघडविणारी आहे.
कर्क : दशमातील शुक्राचे भ्रमण नोकरी व्यवसायात उत्साह वाढविणारे असून, वरिष्ठांशी चांगले संबंध निर्माण होतील. घरात उंची वस्तू, वाहन यांची खरेदी होईल.
सिंह : तृतीयेतील चंद्र-शुक्र योग प्रवास, सहली, मनोरंजनाचा आनंद देणारी असून, नातेवाइक, भावंडांबरोबर वेळ घालवाल. पदवी, पुरस्कार, प्रसिद्धी मिळेल.
कन्या : अष्टमातील शुक्र कौटुंबिक, आर्थिक समस्या निर्माण करणारा असून, घरातील स्त्री वर्गांची काळजी घ्यावी लागेल. मात्र, वारसा हक्काच्या कामात यश मिळेल.
तूळ : सप्तमातील शुक्राचे भ्रमण तरुणांचे विवाह जमविण्यासाठी अनुकूल आहे. सप्ताहाची सुरुवात आनंदी, उत्साह वाढविणारी असून, धनस्थानात होणारी पौर्णिमा मोठे लाभ देणारी राहील.
वृश्चिक : षष्ठातील शुक्राचे भ्रमण नोकरीमध्ये अनुकूल बदल घडविणारी असून, मोठे पद-प्रमोशन मिळेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात दबदबा वाढेल.
धनू : पंचमातील शुक्राचे भ्रमण तरुणांना मनासारखा जोडीदार मिळविण्यासाठी अनुकूल राहील. प्रेमप्रकरणात यश मिळेल. शेअर्ससारख्या व्यवसायात फायदा होईल.
मकर : दशमातील चंद्र-शुक्र योग उद्योगधंद्यात मोठा फायदा देणारा राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादित कराल. घर-जागेच्या कामात यश मिळेल.
कुंभ : तृतीयातील शुक्राचे भ्रमण छोटे प्रवास, सहली घडविणारे असून, भावंडे-नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित ठिकाणी प्रवेश मिळेल.
मीन : धनस्थानातील शुक्राचे भ्रमण कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण करणारे असून, उत्पन्नात मोठे वाढ होईल. वारसा हक्काच्या कामातून लाभ मिळतील.