Badlapur Sexual Abuse Case : बदलापूर घटनेनंतर सरकारला खडबडून जाग; शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय!

Badlapur school sexual abuse Case : बदलापूर घटनेनंतर तोडगा म्हणून सरकारकडून उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. बदलापूरच्या शाळेत जे घडलं, तशा घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Badlapur sexual Abuse case
Badlapur sexual Abuse caseSarkarnama
Published on
Updated on

Badlapur school sexual abuse Case : बदलापूरमध्ये नामांकित शाळेत घडलेल्या घटनेनंतर सरकारला खडबडून जाग आली आहे. जनसामान्यात या घटनेबद्दल प्रचंड संताप आहे. बदलापूर येथील घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. विविध स्तरातून घटनेबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र दुसऱ्याबाजूला या घटनेवरुन राजकारणही सुरु आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यावर तोडगा म्हणून सरकारकडून उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. बदलापूरच्या शाळेत जे घडलं, तशा घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील सर्व शाळांना यापुढे पाळावे लागणार हे नियम :-

1 शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक.

2 शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणे काटेकोर तपासणी करणे गरजेचे.

3 नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्यस्त्रोताद्वारे अथवा कंत्राटी पध्दतीने ज्या नेमणुका केल्या जातात ज्यामध्ये सुरक्षारक्षक, सफाईकामगार, मदतनीस, स्कूल-बसचे चालक अशा संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत होणे आवश्यक आहे.

Badlapur sexual Abuse case
Badlapur Case : "CCTV कोणी गायब केले, वामन म्हात्रेला अटक का नाही?" बदलापूर घटनेवरुन अंधारेंचा CM शिंदे, फडणवीसांवर हल्लाबोल

4 शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षकेत्तर कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.

5 तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने सखी सावित्री समिती स्थापन करावी.

6 शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्यात येणार आहे.

7 प्रत्येक शैक्षणिक संस्थेत शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत व्यक्तींना पोलीस पडताळणी बंधनकारक.

8 शाळेत महिला पालकांची आणि शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करणार.

Badlapur sexual Abuse case
Video Badlapur Rape Case : बदलापूर घटनेतील आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेचे पडसाद मुंबईसह राज्यभरात उमटत आहेत. मंगळवारी या आंदोलनामुळे दिवसभर मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. तर येत्या 24 ऑगस्टला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली आहे. तर या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर काल (मंगळवारी) या आंदोलनामुळे दिवसभर मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती एकीकडे कालच्या आंदोलनातील आरोपींची धरपकड पोलिसांकडून सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com