
Pimpri-Chinchwad News : भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी नुकत्याच केलेल्या आक्षेपार्ह विधानावर राज्यभरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस संतापली आहे. त्यांनी पडळकरांची निर्भत्सना करीत त्यांना चोप देण्याचीच भाषा केली आहे. हे निषेध आंदोलनाचे लोण पिंपरी-चिंचवडपर्यंत आज (ता.२०)आले. तेथे झालेल्या आंदोलनात पडळकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली गेली.
(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअॅप चॅनल जॉईन करा)
गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना काही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सोडले आहे. असा हल्लाबोल शहर राष्ट्रवादीचे नवनियुक्त युवक अध्यक्ष शेखर काटे यांनी केला. त्यांचा रोख भाजपकडे (BJP) व त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिशेने होता. ते, कुणावरही आक्षेपार्ह बोलतो, पण गेल्या विधानसभेला त्याचे डिपॉडिट जप्त झाले होते, याकडे काटेंनी लक्ष वेधले. आता त्याला नेत्यांच्या इशाऱ्यावर भुंकल्याशिवाय चालणार नाही. पण, गोपीचंद पडळकर जे बोलत आहेत. ते त्यांच्या नेत्यांना मान्य आहे का ? असा सवाल त्यांनी नाव न घेता भाजपला केला. राजकीय, सामाजिक जीवनात पडळकरांनी सभ्यता ठेवावी, अन्यथा आम्ही त्याचा इतिहास महाराष्ट्रासमोर मांडू... असा इशाराही त्यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मुख्य आणि मध्यवर्ती अशा पिंपरी चौकात हे आंदोलन झाले. त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल पडळकरांचा निषेध केला.
या वेळी महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, माया बारणे, माजी नगरसेवक संजय नेवाळे, मुख्य संघटक अरुण बोऱ्हाडे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, शहर प्रवक्ते विनायक रणसुभे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, महिला अध्यक्ष गंगा धेंडे, वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष ज्योती गोफणे, लीगल सेल अध्यक्ष संजय दातीर पाटील, शहर उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया आदी सहभागी झाले होते. त्यात त्यांनी गोपीचंद पडळकरांचे करायचे काय, खाली डोकं वर पाय अशी जोरदार घोषणाबाजी केली.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.