

PMC NOTA News: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत ४१ प्रभागांमध्ये १६३ नगरसेवक निवडून आले आहेत. यांपैकी अनेकजण अवघ्या काही मतांनी पराभूत झाले त्यामुळं त्यांची स्वप्न धुळीस मिळवली ती NOTA ने, पण याच नोटामुळं अनेकांना संधीही मिळाल्या. पण या नोटामुळं कोणाचा फायदा आणि कोणाता तोटा झालेला असला तरी याची मुख्य गंमत वेगळीच आहे. एकही पसंतीचा उमेदवार नाही याची मतदार नोटाचा वापर करतात. पुणेकरांनी यंदाच्या निवडणुकीत दणक्यात नोटाचा वापर केल्याचं आकडेवारीवरुन दिसून आलं आहे. विशेष म्हणजे सर्वात हायव्होल्टेज निवडणूक ज्या प्रभागात झाली तिथं सर्वाधिक मतदान हे नोटाला मिळालं आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत कोण निवडून आलं, कोण पडलं? याची चर्चा झाली त्यांचे विजयोत्सवही साजरे झाले यानंतर आता None Of The Above (NOTA) ला पडलेली मतांची आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी पाहिल्यानंतर या निवडणुकीत अत्यंत मजेशीर बाबीही समोर आल्या आहेत. त्यानुसार, यंदाच्या महापालिका निवडणुकीत तब्बल १२ टक्के पुणेकरांनी नोटाचा पर्याय निवडला आहे. म्हणजेच पुण्यात एकूण मतदारांची संख्या ही ३५ लाख ५२ हजार ६३७ इतकी आहे. यांपैकी ५१ टक्के मतदान पार पडलं, ही संख्या १८ लाख ३६ हजार इतकी आहे. म्हणजेच इतक्या लोकांनी प्रत्यक्ष मतदान केलं. तर ४१ टक्के मतदारांनी मतदानच केलं नाही. पण मतदान केलेल्या ५१ टक्के मतदारांपैकी १२ टक्के मतदारांनी अर्थात २ लाख १६ हजार मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे.
पुण्यात सर्वात उशीरा म्हणजे मध्यरात्री २ वाजता जाहीर झालेला हायव्होलटेज लढतीचा निकाल हा प्रभाग क्र. ९ (सूस-बाणेर-पाषाण) होता. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांचा निकाल सर्वात उशीरा जाहीर झाला होता. यात ते चुरशीच्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांना ३५,६०४ मत मिळाली. त्याचबरोबर या प्रभागातील इतर विजयी उमेदवारांपैकी भाजपच्या रोहिणी चिमटे (४१,९८०), बाबुराव चांदेरे (२८,५४०), मयुरी कोकाटे (३५,१५४) इतकी मतं मिळाली. पण विशेष आणि धक्कादायक म्हणजे NOTA ला इथं तब्बल ११,५७६ इतकी पुण्यातील नोटाच्या मतांपैकी विक्रमी मतं मिळाली. म्हणजेच या प्रभागात ११,५७६ मतदारांनी इथून निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांपैकी एकालाही मतदान केलं नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.