
Voice Of Devendra: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा एकदा नव्या वादात सापडलं आहे. या विद्यापीठानं विद्यार्थ्यांसाठी 'व्हॉईस ऑफ देवेंद्र' नावानं नवा उपक्रम सुरु केला आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम राबवण्याची आणि त्याच्या प्रचाराची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजना अर्थात NSS च्या विद्यार्त्यांवर सोपवण्यात आली आहे. या उपक्रमावर आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतला असून विद्यापीठाला खडे बोल सुनावले आहेत.
ट्विटद्वारे रोहित पवारांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. यामध्ये ते म्हणतात, विद्यापीठानं राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचं नसतं याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतो. निवडणूक आयोग भाजपच्या एखाद्या डिपार्टमेंटप्रमाणे काम करत असल्याचं संपूर्ण देश बघत आहे, आता शिक्षणाची मंदिरं असलेली विद्यापीठं देखील त्याच पंक्तीत बसणार असतील तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा? विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तसंच Voice of Democracy मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले तर अधिक योग्य राहील.
'व्हॉईस ऑफ देवेंद्र' ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून ती आयोजित केली जात आहे. ही स्पर्धा तरुणांना 'विकसित महाराष्ट्र' या दृष्टीकोनाशी जोडणारी आणि त्यांच्या नेतृत्व वक्तृत्व कौशल्यांना विकसित करणारं एक सशक्त व्यासपीठ आहे. ही स्पर्धा महाराष्ट्रातील १४ ते २५ वयोगटातील तरुण तरुणींसाठी खुली असून, स्पर्धेचा मुख्य विषय 'विकसित महाराष्ट्र' हा आहे.
तसंच स्पर्धा विविध टप्प्यात विभागलेली आहे. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील सर्व NSS च्या स्वयंसेवकांना या स्पर्धेबाबत माहिती देऊन जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होण्यासाठी सूचित करण्यात यावं, असं यासंदर्भातील निवेदनात म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.