कोविड सेंटरवर फोटो काढणे एवढाच काहींचा उद्योग - खासदार डॉ. सुजय विखे पाटील

नगर तालुक्यातील आगडगाव, रांजणी, हातवळण येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, प्रमुख उपस्थित होते.
sujay vikhe.jpg
sujay vikhe.jpg

नगर तालुका ः कोविड सेंटरवर फक्त फोटो काढणे, ते सोशल मीडियावर प्रसिद्धिमाध्यमातून फ्लॅश करणे, एवढाच आज काहींचा उद्योग सुरू आहे. केंद्र सरकार मात्र कोविडवर शिस्तबद्ध काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार दिवसाला २० लाख लोकांचे लसीकरण करीत आहे. एखाद्या देशाची लोकसंख्याही २० लाख नाही, तेवढे लसीकरण आपण एका दिवसात करतो आहोत. यापुढील काळात गावातील वॉर्ड तेथे लसीकरण उपक्रम प्रत्येक गावात राबवण्यात येईल, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.


नगर तालुक्यातील आगडगाव, रांजणी, हातवळण येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, प्रमुख उपस्थित होते. कोविड सेंटरवर फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या काही नेत्यांचा त्यांनी खरमरीत शब्दांत समाचार घेतला.

हेही वाचा...


विखे पाटील म्हणाले, की तालुक्यातील प्रत्येक रस्ता, बाह्यवळण रस्ता, सूरत महामार्ग आणि इतर महामार्गाने जोडला जात असल्याने तालुक्यातील युवकांना, शेतकऱ्यांना चांगले दिवस असतील. ज्या गावातून महामार्ग गेलेल्या इतर गावांची प्रगती आपण पाहत आहात. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींचा मोबदला लवकरात लवकर मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या विकासाबरोबरच सामान्य नागरिकांचा विकास होणार आहे. तालुक्यातील डोंगरी भागात तातडीने मोबाईल टॉवर उभारण्यावर भर दिला जाणार आहे. नगर तालुक्यातील जनतेचा आणि विखे घराण्याचा एक वेगळा ऋणानुबंध आहे. तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने कर्डिलेंच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार आहे.


या वेळी आगडगाव येथील मारुती मंदिर परिसर पेव्हिंग ब्लॉक (१० लाख), आगडगाव ते मोरदरा रस्ता (९० लाख), नगर ते मिरी रस्ता (२ कोटी ४२ लाख), कौडगाव-रांजणी ते गोरे वस्ती, भेंडेकर वस्ती रस्ता (३ कोटी ८२ लाख),
हातवळण ते मांडवगण फाटा रोड (२५ लाख) इत्यादी विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, रेवण चोभे, पंचायत समिती सदस्य सुनीता भिंगारदिवे, भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बलभीम कराळे, आगडगावचे सरपंच मच्छिंद्र कराळे यांच्यासह नगर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com