चारदा चौकशी झालेल्या भोसरी जमीन खरेदीची ईडी पाचव्यांदा चौकशी करणार : खडसे

सर्व कागपदत्रांसह चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार आहोत.
ED issues notice to Eknath Khadse in Bhosari land purchase case
ED issues notice to Eknath Khadse in Bhosari land purchase case

जळगाव : भोसरी (जि. पुणे) येथील जमीन खरेदी प्रकरणी आत्तापर्यंत आपली चार वेळा विविध संस्थांकडून चौकशी झाली आहे. आता पुन्हा सक्तवसुली संचालनायाकडून (ईडी) चौकशीसाठी नोटीस आली आहे. सर्व कागपदत्रांसह चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार आहोत, असे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

खडसे यांनी जळगाव येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. खडसे म्हणाले, ईडीची नोटीस मला प्राप्त झाली आहे. भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी ही चौकशी करण्यात येणार आहे. येत्या बुधवारी (ता. 30 डिसेंबर) आपल्याला मुंबई येथील "ईडी'च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होण्याचे पत्रात कळविण्यात आले आहे. त्यानुसार चौकशीला आपण संपूर्ण सहकार्य करणार असून कागदपत्रांसह मी स्वतः किंवा आपला प्रतिनिधी या चौकशीसाठी जाणार आहे. 

पत्नीच्या नावे खरेदी 

भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणाबाबत खडसे म्हणाले की, या जमीन खरेदीचा आपला संबंध नाही, पत्नीच्या नावे ही जमीन खरेदी करण्यात आली आहे. या जमिनीच्या खरेदीची सर्व माहिती आपण या चौकशीत देणार आहोत. 

पाचव्यांदा चौकशी 

भोसरीतील जमीन खरेदीची अगोदर चार वेळा चौकशी झाली असल्याची माहितीही खडसे यांनी दिली. ते म्हणाले या पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक आणि पुणे, प्राप्तीकर विभाग, न्यायमूर्ती झोटिंग यांच्या समितीनेही याची चौकशी केली आहे. आपण त्यांना या चौकशीत पूर्ण सहकार्य करून कागदपत्रे सादर केली आहेत. आताही आपण या खरेदी व्यवहाराची संपूर्ण कागदपत्रे चौकशीत सादर करणार आहे. 

नो पॉलिटीकल क्वेशन 

या पत्रकार परिषदेत खडसे यांनी कोणत्याही राजकीय प्रश्‍नांना उत्तर दिले नाही, ते म्हणाले आपण केवळ आपल्याला आलेल्या नोटीस संदर्भातच बोलणार आहोत. आज इतर कोणत्याही प्रश्‍नाला उत्तर देणार नाही. आज "नो पॉलिटीकल क्वेशन'. मात्र नंतर आपण राजकीय प्रश्‍नांना उत्तर देणार आहोत. 

लोढांची दारू पिऊन पत्रकार परिषद 

जळगाव जिल्ह्यातील प्रफुल्ल लोढा यांनी काल (ता. 25 डिसेंबर) पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी खडसे यांच्यावर टीका केली होती. याबाबत खडसे यांना विचारले असता, लोढा यांचे नाव न घेता ते म्हणाले, दारू पिऊन पत्रकार परिषद घेणाऱ्या माणसाची दखल मीडिया घेत आहे. त्याबद्दल आपणास आश्‍चर्य वाटत आहे. हे अत्यंत गंभीर आहे. या माणसाची आपल्याला दखलही घ्यावीशी वाटत नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com