
तासगाव : आर. आर. आबा आणि डॉ. पतंगराव कदम यांचे जसे भावा भावासारखे नाते होते तसेच नाते पुढेही राहिल. माझे आणि रोहीतचे नाते भावासारखे असेल. रोहीत माझ्या लहान भावासारखा आहे असे कॉंग्रेसचे नेते आणि आमदार विश्वजित कदम यांनी म्हणतात तासगावात टाळ्यांच्या कडकडात झाला.
तासगाव येथे आर. आर. आबा पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात विश्वजित बोलत होते. ते म्हणाले, की कदमसाहेब आणि आबासाहेब जेव्हा जेव्हा एका व्यासपीठावर येत तेव्हा तेव्हा दोघे एकमेकाला भाऊ भाऊ म्हणत. पतंगराव आबांना धाकटा भाऊ म्हणत आणि तीच रेघ पकडून आबा पतंगराव साहेबाना थोरला भाऊ असे संबोधत. दोघांचे भाषण ऐकणे म्हणजे एक पर्वणी असे. एकमेकांना भाऊ भाऊ म्हणत एकमेकांना चिमटे काढत. कोपरखळ्या मारत असत. दोन वेगवेगळ्या पक्षात असूनही त्यांनी हे आगळेवेगळे नाते अखेरपर्यंत जपले.''
हाच धागा पकडून विश्वजित पुढे म्हणाले, की या दोघांनी जसे नाते जपले तसेच नाते आम्हीही जपणार आहोत. रोहीत माझा लहान भाऊ आहे. आता पुढच्या पिढीतही चालू राहील.
विश्वजित कदम यांचे भाषण सुरू असताना वंचित आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर व्यासपीठावर आले. भावाभावाच्या संबंधांचा धागा पुढे पकडून "गोपीचंद पडळकर! तुम्ही सुध्दा मला भावासारखेच आहात!" असे म्हणताच सभा मंडपात एकच हास्यकल्लोळ उसळला. विशेष म्हणजे व्यासपीठावरन जाताना विश्वजित कदम आणि गोपीचंद पडळकर एकमेकांच्या हातात हात घालून बाहेर पडले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.