आमची मोर्चेबांधणी आणि तटबंदी काय आहे, याची कल्पना त्यांना आहे!

केंद्र सरकारने आम्हाला एक खाऊचा डबा दिला आहे. पण तो डबा रिकामा, असल्याचे राऊत म्हणाले.
Sanjay Raut .jpg
Sanjay Raut .jpg

नवी दिल्ली : आरक्षणाबाबतची अपवादात्मक परिस्थिती आहे. त्याबाबत काय करायचे हे राज्य ठरवेल. आरक्षणाच्या विषयात कोणताही कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेऊ. केंद्रानेही घ्यावी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे वकील आहेत. त्यांना कायद्याचे पेच जास्तच माहीत आहेत. आम्ही फडणवीसांच्या मतांचा आदर करतो. सरकारला काही वकिली सल्ला लागला तर त्यांचा सल्ला नक्कीच घेईल. हा काही राजकीय मानपानाचा विषय नाही. एका मोठ्या समाजाला मदत करण्याचा हा विषय आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. (Sanjay Raut criticizes Leader of Opposition Devendra Fadnavis) 

संसदेत आज 102 व्या घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा होणार आहे. त्या विषयी राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले, राज्यांना अधिकार मिळाले तरी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्याने वाढवावी लागेल. राज्यांना अधिकार मिळूनही राज्य आरक्षण देऊ शकेल की नाही यात शंका आहे. केंद्र सरकारने जे पाऊल टाकले त्याकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहतो. त्यावर आधी लोकसभेत चर्चा होईल. उद्या राज्यसभेत येईल. 

आम्ही पूर्णपणे बिलाला पाठिंबा देत आहोत, असेही राऊत यांनी सांगितले. या विधेयकावर आम्ही मते मांडू आणि त्यातील त्रुटीही दाखवू. आम्हाला बिल लांबवायचे नाही. मराठा समाजाचा जो रेटा आहे, त्यातून सरकारला मार्ग काढावा लागेल. केंद्र सरकारने आम्हाला एक खाऊचा डबा दिला आहे. पण तो डबा रिकामा, असल्याचे राऊत म्हणाले.

राज्यातील भाजपच्या नेत्यांची काल दिल्लीत बैठक पार पडली. यावेळी बैठकीमध्ये महाविकास आघाडी सरकार विरोधात मोर्चेबांधणी करण्याचा निर्णय झाला. त्या विषयी विचारले असता राऊत म्हणाले, मोर्चेबांधणी हे शब्द बोलायला सोपे आहेत. आमची मोर्चेबांधणी व आमची तटबंदी काय आहे, याची कल्पना त्यांना आहे. जनता 2024 च्या निवडणुकीची वाट पाहत आहे. त्यावेळी जनता कुणाला आशीर्वाद देणार ते दिसेलच, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com