कोण म्हणतं मी राजकारणातून बाजूला गेलो : विजय औटी

मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत प्रस्तावित एशियन डेव्हलपमेंट बँक अर्थसाहित पारनेर व नगर तालुक्यात सन 2019-20 या आर्थिक वर्षात बॅच दोन अंतर्गत तालुक्यात 11 कोटी 93 लाख 31 हजार रुपयांचा निधी मंजुर झाला.
Vijay auti 2.jpg
Vijay auti 2.jpg

पारनेर : अनेकांना वाटत असेल मी राजकारणातून बाजूला गेलो आहे, मात्र तसे नाही. मी कदापिही शिवसैनिकांना (Shivsena) वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामुळे यापुढेही तालुक्यातील विकासाची परंपरा खंडित होऊ देणार नाही, असे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी सांगितले. (Who says I stepped aside from politics: Vijay Auti)

औटी म्हणाले, की मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत प्रस्तावित एशियन डेव्हलपमेंट बँक अर्थसाहित पारनेर व नगर तालुक्यात सन 2019-20 या आर्थिक वर्षात बॅच दोन अंतर्गत तालुक्यात 11 कोटी 93 लाख 31 हजार रुपयांचा निधी मंजुर झाला.

ते म्हणाले, की विधानसभा उपाध्यक्ष असताना मी तालुक्यामध्ये कोठ्यावधी रूपयांची विकास कामे केली आगेत. त्याचे तमाम तालुक्यातील जनता साक्षिदार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. एशियन बँकेकडून अर्थसहाय्य घेऊन 2018 पासून तालुक्यातील सहा गावांचे रस्त्यांचे प्रस्ताव ग्रामसभेत ठराव घेऊन त्यांचा कोल्हापूर येथील एजन्सी कडून सर्वे केला होता. या रस्त्यांसाठी एशियन बँकेचे अर्थसहाय्य राज्याने घेतले आहे. बँकेच्या सर्व अटींबाबत राज्य सरकार बरोबर करार पूर्ण झाल्याने आता हे अर्थसहाय्य उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आता टेंडर प्रोसेसिंग व प्रत्यक्षात कार्यरंभ आदेश मिळाले आहेत. या कामाबाबत मला मनस्वी आनंद झाला आहे. त्यामुळे तालुक्यात सुमारे 12 कोटी तसेच नगर तालुक्यात चार कोटी 24 लाख 26 हजार रुपयांचे रस्ते होणार आहेत.

पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात 16 कोटी 17 लाख 57 हजार रुपयांचा निधीचा कार्यरंभ आदेश मिळाला आहे. सरकार शिवसेनेचे असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून भविष्यात तालुक्यातील विकास कामे मोठया प्रमाणात मार्गी लागणार आहेत. जिल्हा परिषद च्या माध्यामातून काशीनाथ दाते व पंचायत समितीच्या माध्यमातून सभापती गणेश शेळके यांनीही तालुक्यात विविध विकास कामे करूण विकासाची घोडदौड सुरू केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंजूर रस्ते व मिळालेला निधी

मावळे वाडी ते गावठी वस्ती (दोन कोटी 79 लाख 89 हजार), अस्तगाव धोकटी ते आमले वस्ती ( एक कोटी 50 लाख सहा हजार), जामगाव ते सारोळा अडवाई ( एक कोटी 82 लाख 15 हजार) ,जामगाव माथा साठे वस्ती ते लोणी हवेली ( रस्ता एक कोटी 86 लाख 66 हजार ), राष्ट्रीय महामार्ग 58 ते हनुमान वाडी ( एक कोटी 58 लाख 27 हजार), राष्ट्रीय महामार्ग 222 ते धोत्रे खुर्द ( दोन कोटी 36 लाख 28 हजार ) तसेच
नगर तालुक्यात कामरगाव ते विठ्ठलवाडी ( दोन कोटी 24 लाख 71 हजार), निमगाव वाघा ते कापसे वस्ती ( 92 लाख 96 हजार ) व सारोळा कासार ते दरेमळा (एक कोटी सहा लाख 59 हजार ), या प्रमाणे निधी मंजूर झाला आहे. या कामांना लगेचच सुरवात होणार असल्याचेही औटी यांनी सांगितले.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com