Modi Sarkar Achievement : मोदी सरकारचे 'हे' कार्य सुवर्णक्षरांनी लिहिण्यासारखे; काँग्रेसच्या तुलनेत मोठी झेप..

Modi Sarkar Achievement : देशाच्या इतिहासात काँग्रेसच्या तुलनेत मोदी सरकारने 'या' श्रेत्रात घेतलेली झेप ऐतिहासिक,
Modi Sarkar Achievement :
Modi Sarkar Achievement :Sarkarnama
Published on
Updated on

सचिन देशपांडे -

Delhi News : देशातील 140 कोटी लोकसंख्येचा विचार केल्यानंतर प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळावा. यासाठी मेडिकल एज्युकेशन क्षेत्रात भरीव कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या काळात झाले. याची नोंद सुवर्णक्षरांनी करावी लागेल, असे हे महत्त्वाचे कार्य आहे. मोदी सरकारमुळे देशात दहा वर्षात मेडिकल काॅलेजची संख्या 82 टक्क्यांनी वाढली. पोस्ट ग्रॅज्युएट PG च्या सीट्स या 127 टक्क्यांनी वाढल्या. इतक्यावर मोदी सरकार थांबले नाही तर, त्यांनी दहा लाख लोकसंख्येसाठी 100 एमबीबीएस सिट्स देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हे करत असताना देशभरात एमबीबीएस (MBBS) च्या जागांमध्ये 112 टक्क्यांनी वाढ केली. देशाच्या इतिहासात काँग्रेसच्या तुलनेत मोदी सरकारने वैद्यकिय शिक्षण श्रेत्रात घेतलेली झेप ऐतिहासिक, दूरगामी त्याच बरोबर व्यापक जनहिताची ठरते. (Latest Marathi News)

Modi Sarkar Achievement :
NCP MLA Disqualification Timetable : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रसंदर्भातील वेळापत्रक जाहीर; कशी आहे प्रक्रिया?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' असा मंत्र दिला. तो मंत्र आणि 'नरसेवा ही नारायण सेवा' हे मान्य करत देशभरातील रुग्णांसाठी दिलासा देणारे काम मोदी सरकार ने केले आहे. देशात वैद्यकिय शिक्षण श्रेत्रात काँग्रेसच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने भरिव कार्य गेल्या दहा वर्षात करुन दाखविले. हे करताना त्या-त्या राज्यातील सरकारांचा कुठलाही विचार मोदी यांनी केला नाही.

पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या 'अंत्योदय' हा शब्द खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने प्रत्यक्षात साकारला गेला. जगभरातील सर्वात मोठी आयुष्मान भारत यो ररजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनदयाल उपाध्याय यांच्या जन्मदिनी अर्थात 2 सप्टेंबर रोजी सुरु केली होती. या आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाख पर्यंतच्या रुग्ण खर्चाची जबाबदारी केंद्र सरकार घेते. या योजनेतून कोट्यावधी रुग्णांना फायदा झाला आहे. (Latest Political News)

Modi Sarkar Achievement :
Mallikarjun Kharge : एक मोदी सर्वांना भारी म्हणतात, मग हे मणिपूरला का जात नाहीत? खर्गेंचा सवाल

पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या 'अंत्योदय' याच मुलमंत्रावर काम करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशात रुग्णसेवेसाठी मेडिकल काॅलेज उघडले, एमबीबीएस आणि पीजी च्या सिट्स वाढविल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ता काळात देशातील मेडिकल एज्युकेशन क्षेत्रात सकारात्मक निर्णय घेण्यात आले. देशातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात झालेला हा अमुलाग्र बदल केवळ दहा वर्षाच्या कालावधीत झाला. त्याचे सर्व श्रेय हे निश्चितच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला जाते.

काँग्रेस सत्ता काळात मेडिकल एज्युकेशन हे धनाढ्यांचे शिक्षण होते ते सामान्यांचे शिक्षण करण्यात मोदी सरकारला मोठे यश आले. वैद्यकिय शिक्षण श्रेत्रात गुणवत्तेला अधिक स्थान प्राप्त झाले. त्याच बरोबर त्याचा थेट फायदा ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी होत आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालय असो की, एम्स यांच्यात देखील देशभरात वाढ झाली. यातून व्यापक रुग्णहित साधले गेले.

देशात 2014 पुर्वी मेडिकल काॅलेजची संख्या ही 387 होती ती आज 706 आहे. तर पीजी च्या 2014 पुर्वी 31 हजार 185 जागा होत्या त्या आता 70 हजार 674 झाल्या आहेत. इतक्यावर मोदी सरकार थांबले नाही तर त्यांनी थेट एमबीबीएस च्या जागांमध्ये वाढ करत देशासाठी आरोग्य सेवेत सर्वोच्च काम केले. सन 2014 पुर्वी एमबीबीएस 51 हजार 348 जागा होत्या, त्या गेल्या दहा वर्षात 1 लाख 8 हजार 940 इतक्या झाल्या आहे.

देशात एमबीबीएसच्या एकूण जागांचा विचार केल्यास कर्नाटक मध्ये सर्वाधिक जागा आहे. तिथे 11 हजार 745 सिट्स आहे. तामिलनाडू येथे 11 हजार 650 एमबीबीएसच्या जागा आहे. तर त्या खालोखाल महाराष्ट्रात 10 हजार 845 जागा आहे. उत्तर प्रदेशात 9 हजार,903 जागा आहेत. तेलंगणामध्ये 8 हजार 490, गुजरात 7 हजार 150, आंध्र प्रदेश मध्ये 6 हजार 845, राजस्थानमध्ये 5 हजार 575, पश्चिम बंगाल मध्ये 5 हजार 272, मध्य प्रदेश 4 हजार 800, केरळ 4 हजार 655 एमबीबीएस च्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

Modi Sarkar Achievement :
BJP-MNS Alliance : भाजप-मनसेची अनोखी युती; भाजप माजी आमदारांची कन्या होणार राजू पाटलांची सून

मोदी सरकारने एमबीबीएस च्या जागा वाढवितांना कुठे ही त्या राज्यात भाजपाचे सरकार आहे की, राजकीय विरोधकांचे याचा विचार केला नाही, हे आकडेवारी वरुन स्पष्ट होत आहे. तर मेडिकल एज्युकेशन च्या माध्यमातून रुग्णसेवेवर भर देत मुलभूत गोष्टींवर ध्येय निश्चित केले. दर्जेदार रुग्णसेवेसाठी उचलेले हे सर्वात मोठे पाऊल मोदी सरकारचे म्हणावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com