Rashmi Mane
सध्या पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णीं यांनी केली आहे. पण पुण्यातील या ठिकाणांवर आहे पेशवे घराण्याचा ठसा. चला पाहूया पुण्यात पेशवेंच्या नावाने कोणती ठिकाणं ओळखली जातात!
पेशवे घराण्याचे प्रमुख नानासाहेब पेशवेंच्या नावाने "नाना पेठ" प्रसिद्ध आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात वसलेली ही पेठ ऐतिहासिक व्यापारी भाग म्हणून ओळखली जाते.
सदाशिव पेशवेंच्या नावाने "सदाशिव पेठ" नाव ठेवण्यात आली. आजही इथं पारंपरिक पुणेरी संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो.
रास्ता पेशवे म्हणून ओळखले जाणारे रामचंद्र मल्हार रास्ते यांच्या नावावरून "रास्ता पेठ" तयार झाली. ही पेठ त्यांच्या समाजकार्यासाठी ओळखली जाते.
गणेश रामचंद्र पेशवेंच्या नावाने "गणेश पेठ" अस्तित्वात आली. ही पेठ जुन्या पुण्यातील महत्त्वाचा भाग मानली जाते.
दुर्दैवी पणे मृत्युमुखी पडलेले नारायणराव पेशवे यांचं स्मरण म्हणून "नारायण पेठ" या भागाला नाव देण्यात आलं आहे.
पेशवे पार्क – बालगंधर्व रंगमंदिराजवळील उद्यान.
मस्तानीबाईंशी संबंधित ऐतिहासिक तलाव.
याचे नामकरण "श्रीमंत नानासाहेब पेशवे जलाशय" असे करण्यात आले आहे.
पेशवे काळातील दागिने, चित्रे, शस्त्रास्त्रे येथे पहावयास मिळतात.