Amol Sutar
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांना ईडी'ने दिल्ली मद्य धोरणाच्या मुद्द्यावर नोटीस तीनदा नोटिस बजावली आहे.
अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते, असे आप नेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, ईडीने केजरीवाल यांच्यावर केलेल्या आरोपांचीही माहिती समोर आली आहे.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांच्या घरी झालेल्या बैठकीपासून ते पक्षाला मिळालेल्या पैशांपर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.
'प्रोसीड ऑफ क्राइम' दरम्यान सर्वोच्च न्यायालयात मनीष सिसोदिया यांच्या जामिनावरील सुनावणी दरम्यान ईडीने 338 कोटी रुपयांचा मनी ट्रेल ठेवला होता.
केजरीवाल यांच्या घरी नवीन दारू धोरणाबाबत झालेल्या बैठकीत काही प्रमुख नेते, लोक सहभागी झाले. त्याआधारेही ईडीला केजरीवाल यांची चौकशी करायची आहे.
मद्य धोरण, अबकारी प्रकरणातील आरोपी इंडोस्पिरिटचे संचालक समीर महेंद्रूने ईडीला सांगितले की, केजरीवाल यांच्या जवळच्या विजय नायरने फेस टाईम ॲपद्वारे भेट घेतली.
अरविंद केजरीवाल यांनी त्यांना विजय नायर आपला माणूस असून त्यांनी नायर यांच्यावर विश्वास ठेवावा, असे सांगितले होते.
मनीष सिसोदिया यांचे तत्कालीन सचिव सी अरविंद यांनी अबकारी धोरणाचा मार्जिन नफा 6% होता, जो केजरीवाल यांच्या मंजुरीने वाढवून 12% करण्यात आल्याचे सांगितले.
नवीन उत्पादन शुल्क धोरणाबाबत मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. कुठेतरी अबकारी धोरणाच्या प्रकरणाची तार थेट अरविंद केजरीवाल यांच्याशी जोडलेली असल्याचे दिसून आले.