Roshan More
26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे संविधान सभेविषयी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया
संविधानसभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. या पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद सिन्हा होते आणि फ्रँक अँथनी उपाध्यक्ष होते. कायमस्वरुपी अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड 11 डिसेंबरला झाली.
संविधान सभेची मूळ सदस्यसंख्या ३८९ होती; फाळणीनंतर ती २९९ झाली. बंगाल ६०, संयुक्त प्रांत ५५, मद्रास ४९, बिहार ३६, पंजाब २८, मुंबई २१, मध्य प्रांत व बेरार १७, आसाम १०, ओरिसा ९, सिंध ४ आणि वायव्य सरहद्द प्रांत ३ जागा होत्या.
दिल्ली, अजमेर-मेरवाडा, कूर्ग आणि ब्रिटिश बलुचिस्तान या प्रत्येक प्रांताला प्रत्येकी एक जागा होती. संविधान सभेत सामान्यतः १५ महिला सदस्य असल्याचे नमूद केले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांना घटनेचे शिल्पकार देखील म्हटले जाते.एस. एन. मुखर्जी हे संविधानाचे मुख्य मसुदाकार होते. तर, सर बेनेगल नरसिंग राव (बी. एन. राव) हे संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते.
भारतीय संविधानाची मूळ प्रत हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये हाताने लिहिण्यात आली.
इंग्रजी संविधानाची मूळ प्रत प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी सुलेखनातून लिहिली. तर, हिंदी संविधानाची मूळ प्रत वसंत कृष्ण वैद्य यांनी सुलेखनातून लिहिली.२४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेच्या २८४ सदस्यांनी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या.
संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले गेले आणि २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले.