दुष्काळाचे संकट दूर होऊ दे..., एकनाथ शिंदेंचे विठ्ठलाला साकडे, सहकुटुंब कार्तिकी एकादशीची महापूजा, पाहा फोटो

Roshan More

महापूजा

कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठ्ठलाची सहकुटुंब शासकीय महापूजा केली.

Eknath Shinde Kartik Ekadashi Mahapuja

वारकऱ्यांना मान

यावेळी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उचेगाव मधून आलेले सुधाकर शिंदे आणि प्रणिता शिंदे या मानाच्या वारकऱ्यांसह ही पूजा करण्याचा बहुमान शिंदेंना मिळाला.

Eknath Shinde Kartik Ekadashi Mahapuja

विठ्ठलाला साकडे

यंदा भीषण दुष्काळ आहे. या संकटाची व्याप्ती पाहता ते दूर होऊन बळीराजाला दिलासा मिळो एवढेच मागणे पांडुरंगाच्या चरणी मागितल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

Eknath Shinde Kartik Ekadashi Mahapuja

कुटुंबीय सोबत

पुजेला एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सुन वृषाली श्रीकांत शिंदे, नातू रुद्रांश शिंदे उपस्थित होते.

Eknath Shinde Kartik Ekadashi Mahapuja

पुस्तकाचा प्रकाशन

शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर मंदिराच्या सभा मंडपात संतपूजन सोहळा आणि धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे मुखपत्र असलेल्या आनंदपंढरी या पुस्तकाचा प्रकाशन एकनाथ शिंदेंच्या हस्ते झाले.

Eknath Shinde Kartik Ekadashi Mahapuja

25 कोटीच्या निधीची घोषणा

पंढरपुरात दर्शन मंडप, स्काय वॉक आणि टोकन पद्धतीची दर्शन रांग व्यवस्था उभारण्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर हे काम पूर्ण करण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त २५ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा शिंदे यांनी केली.

NEXT : जावडेकरांच्या उपस्थितीत झालेला भाजपमध्ये प्रवेश, 'या' नेत्याची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी

Padmaja Venugopal | Sarkarnama
येथे क्लिक करा