Roshan More
कर्जबाजारीपणामुळे परभणीतील माळसोन्ना येथे सचिन बालाजी जाधव या 35 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली.
सचिनच्या आत्महत्येनंतर त्याची सात महिन्यांची गर्भवती पत्नी ज्योत्स्ना हिने देखील विष घेत आत्महत्या केली.
कर्ज फेडू न शकल्याने शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याने बच्चू कडू सरकारवर संतापले.
शासनाच्या धोरणामुळे झालेल्या आत्महत्येच्या निषेधार्थ रक्तदान करत आंदोलन करणार असल्याच्या जाहीर केले.
सचिन व जोत्स्ना जाधव यांच्या घरी रक्तदान करून बच्चू कडूंनी सरकारवर राग व्यक्त करीत आहे.
रक्तदान करून केलेल्या निषेधातून सरकारची अक्कल ठिकाणावर आली नाही तर आम्हाला रक्त सांडवावे लागू नये हीच अपेक्षा, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.