Shiv Chhatrapati Sports Award : आई लोकांच्या घरी धुणी भांडी करायची; पठ्ठ्यानं जिद्दीनं 'शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारा'वर नाव कोरलं

Pradeep Pendhare

मानाचा पुरस्कार

कबड्डी खेळात अहिल्यानगर जिल्ह्यात शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवणारा अस्लम हा प्रा. सुनील जाधव आणि पंकज शिरसाठ यांच्यानंतर तिसरा खेळाडू ठरला.

Aslam Inamdar | Sarkarnama

पुणेरी पलटणाचा कर्णधार

अस्लम हा आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय कबड्डी संघातील खेळाडू असून प्रो-कबड्डीच्या दहाव्या पर्वात विजय मिळवणाऱ्या पुणेरी पलटण संघाचा कर्णधार आहे.

Aslam Inamdar | Sarkarnama

खडतर प्रवास

अस्लम आठ वर्षांचा असताना वडिलांच्या निधनानंतर आपल्या आईच्या कष्टाचं चीज करणारा अस्लमाचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास खडतर असाच आहे.

Aslam Inamdar | Sarkarnama

आईचे कष्ट

तीन मुले आणि दोन मुली, अशा मोठ्या कुटुंबाचा संभाळ करताना अस्लमच्या आईनं लोकांच्या घरी धुणी भांडी करत, मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार दिले.

Aslam Inamdar | Sarkarnama

प्राथमिक शिक्षण

अस्लमचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद टाकळीभान शाळेत, तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे महाविद्यालयात झाले.

Aslam Inamdar | Sarkarnama

मोठ्या भावाचा सपोर्ट

मोठा भाऊ वसीम याची महाराष्ट्र पोलिस दलात भरतीनंतर काहीशी, आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर अस्लमनं पूर्णवेळ कबड्डीच्या सरावावर अधिक भर दिला.

Aslam Inamdar | Sarkarnama

खेलो इंडियात एन्ट्री

अस्लमची खेलो इंडिया स्पर्धेत निवड झाली. यानंतर प्रो-कबड्डीतील पुणेरी पलटण संघातून दमदार कामगिरी केली.

Aslam Inamdar | Sarkarnama

कबड्डी संघात निवड

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी संघात स्थान पटकावत अस्लमने अष्टपैलु खेळ करत भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून दिले.

Aslam Inamdar | Sarkarnama

NEXT : पोलिस, न्यायाधीशांमध्ये SC, ST, OBC किती?

येथे क्लिक करा :